💥लोणारवाडीचे सरपंच नवनाथ मुंडे यांना राज्यस्तरीय सोमेश्वर साथी आयकॉन पुरस्कार जाहीर...!


💥24 फेब्रुवारी रोजी परभणीत पुरस्कराचे वितरण ; मित्र परिवाराकडून सरपंच नवनाथ मुंडे यांचे अभिनंदन💥

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील लोणारवाडीचे तरूण तडफदार तथा आदर्श सरपंच नवनाथ मुंडे यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दिला जाणारा राज्यस्तरीय सोमेश्वर साथी आयकॉन पुरस्कार जाहीर झाला. दै.सोमेश्वर साथीचे संपादक बालासाहेब फड यांनी पुरस्काराची नुकतीच एक पत्राद्वारे घोषणा केली आहे. लोणारवाडीचे सरपंच नवनाथ मुंडे यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे  तालुक्यातील सरपंच तसेच सर्व स्तरातून मान्यवर, मित्रपरिवार व नातेवाईकांकडून स्वागत व अभिनंदन होत आहे.

         गुरुवार,दि.24 फेब्रुवारी रोजी बी रघुनाथ सभागृह, परभणी येथे एकता सेवाभावी संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिक्षण महर्षि मा.पं. शंकर प्रसाद अग्निहोत्री (अध्यक्ष जय महाकाली शिक्षण संस्थान, वर्धा) यांचा परभणी नगरीत सत्काराचे आयोजन करण्यात आले असून तसेच एकता इंटरनॅशनल फिल्म प्रोडक्शन निर्मित संविधान एक रास्ता या चित्रपटाचा शुभमुहूर्त व दै.द सोमेश्वर साथीच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या ३१ व्यक्तिंचा राज्यस्तरीय सोमेश्वर साथी आयकॉन पुरस्कार २०२२ वितरण सोहळा समारंभ आयोजित करण्यात आला. यावर्षीच्या राज्यस्तरीय सोमेश्वर साथी आयकॉन पुरस्कारासाठी गावाच्या सर्वांगिण विकासासाठी उल्लेखनीय कार्य करणारे लोणारवाडीचे आदर्श सरपंच नवनाथ मुंडे यांना एकापत्राद्वारे पुरस्काराची घोषणा केली आहे. सरपंच नवनाथ मुंडे हे लोणारवाडी शेतकरी, सामान्य कुटुंबातील ते सरपंच पद ते भाजपच्या विविध पदावर त्यांनी काम केले आहे. तालुक्यात तरूण तडफदार म्हणून औळखले जाणारे सरपंच आहेत. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई गोपीनाथराव मुंडे व खा.डॉ. प्रितमताईं गोपीनाथराव मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गावात अनेक विकास कामे करत गावाचा सर्वांगीन विकास केला आहे. गावात केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी यशस्वीपणे करून जनतेचे राहणीमान उंचावण्यासाठी प्रयत्न केले जातात. तसेच अडचणी सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशिल असता. शासनाच्या योजनासोबतच ग्रामस्थांसाठी विविध प्रकारच्या लोकउपयोगी योजना प्रभावीपणे राबविल्या जातात. गावातील कुठल्याही कार्यात स्वतःला झोकून देत गावाचा कायापालट केला.गावात अनेक विकासांची कामे करून गावाचा कायापालट केला आहे.  तसेच संपूर्ण देशात कोरोनाने आहाकार घातला आहे. अशा कठीण परिस्थितीत कोरोनाच्या संकटात जिवाची पर्वा न करता आपले योगदान दिले. सामाजिक जबाबदारी उत्कृष्टपणे चांगल्या प्रकारे पार पाडली आहे. कोरोना संदर्भात जनजागृती असेल टाळेबंदी, कंटनमेन्ट झोनमधील व गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी त्यांना आपल्या उपाय योजना केल्या. मुंबई, पुणे औरंगाबाद येथून आलेल्या नागरिकांना कोरंटाईन करणे, वेळोवेळी शासनाच्या आदेशाचे नागरिकंपर्यंत जाऊन जनजागृती केली आहे. तसेच त्यांना यापूर्वी ही त्यांनी केलेल्या कार्यामुळे याआधी बऱ्याच राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले आहे. धार्मिक, सामाजीक, शैक्षणिक व विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य  उत्कृष्ट कामकाजाबाबत सरपंच नवनाथ मुंडे यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उद्योजक तथा निर्माते संविधान एक रास्ताचे  अरूणजी मराठे, परभणीचे मा.खा.तुकाराम रेंगे पाटील, परभणी पोलिस अधीक्षक अविनाश कुमार, परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता मोहनराव आव्हाड व हैद्राबाद येथील हिंदी चित्रपट अभिनेता अदनान साजिद खान उर्फ गुल्लु दादा प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ तज्ञ अँड अशोक सोनी, परभणी मनपा अध्यक्ष स्थायी समिती गुलमिर खान, कलमानधन समिती अध्यक्ष प्रा.डॉ.अशोक जोंधळे, साहित्यक व समाजसेविका सौ.संगिताताई जामगे यांच्या प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. संयोजक एकता सेवाभावी संस्था संस्थापक अध्यक्ष अजमत खान, दै.द सोमेश्वर साथीचे संपादक बालासाहेब फड, सहनिर्माते संविधान एक रास्ताचे सुरेश हिवराळे, एकता सेवाभावी संस्था विदर्भ अध्यक्ष अनिल नरेडी, एकता सेविभावी संस्था, परभणी जिल्हाध्यक्ष  अरूण पडघन, एकता सेविभावी संस्था, परभणी शहर जिल्हाध्यक्ष सईद अन्सारी उपस्थित राहणार आहेत. सदरील पुरस्काराचे  विशेष समारंभात वितरण करण्यात येणार आहे. स्मृतीचिन्ह, सन्मान पत्र , शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे. यावेळी सरपंच नवनाथ मुंडे म्हणाले की,मिळालेला पुरस्कार माझी सामाजीक जबाबदारी व काम करण्याची नैतिक जबाबदारी वाढवीत आहे. गावातील सर्व नागरिकांचे प्रेम व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्यांचे सहकार्य,सबंध तालुक्यातील मित्र मंडळीचे मार्गदर्शन मला समाजोपयोगी कार्यात नेहमीच मोलाचे ठरते. तसेच ते माझा उत्साह वाढवीत मला सकारात्मक ऊर्जा देत माझी प्रेरणा वाढवीत असल्याचे मत त्यांनी.या  पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल सरपंच नवनाथ मुंडे यांचे, तालुक्यातील सरपंच, धार्मिक, राजकीय , शासकीय अधिकारी व कर्मचारी, शैक्षणीक, पत्रकार, सामाजिक, राजकीय क्षेञातील मान्यवर, मित्र परिवार व नातेवाईकांकडून स्वागत व अभिनंदन होत आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या