💥पुर्णा सहकारी साखर कारखान्याच्या छळाला कंठाळून अल्पभुधारक ऊस उत्पादक शेतकऱ्याने लावली उभ्या ऊसाला आग..!


💥कारखाना प्रशासनाकडून जाणीवपूर्वक ऊस नेण्यास टाळाटाळ केल्यामुळे अखेर त्रस्त शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय💥


पुर्णा (दि.२४ फेब्रुवारी) - तालुक्यातील बरबडी येथील अल्पभुधारक ऊस उत्पादक शेतकरी तुकाराम काशिनाथ शिंदे यांनी वसमत येथील पुर्णा सहकारी साखर कारखाना प्रशासनाच्या त्रासाला कंटाळून कारखाना प्रशासनाच्या भ्रष्ट कारभाराच्या निषेधार्थ काल बुधवार दि.२३ मार्च २०२२ रोजी दुपारच्या सुमारास आपल्या एक एक्कर शेतातील उभा ऊस फुकून दिल्याची दुर्दैवी घटना घडल्यामुळे पुर्णा सहकारी साखर कारखाना प्रशासना विरोधात तालुक्यात सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे.


 या घटने संदर्भात सविस्तर वृत्त असे की मौ.बरबडी येथील अल्पभुधारकशेतकरी तुकाराम शिंदे यांनी आपल्या शेतात मागील वर्षी आक्टोंबर महिण्याततील पहिल्या पंधरवड्यात ऊस लावला होता सदरील ऊस १० व्या महिण्यातला असतानासुद्धा त्यांचा ऊस तोडण्यात आला नाही या संदर्भात त्यांनी पुर्णा सहकारी साखर कारखान्याचे कृषी अधिकारी देशपांडे,वरशैल सोलव,ऊस पुरवठा अधिकारी कदम व सिलिप बॉय सोळंके यांच्यासह कारखान्याचे डायरेक्टर चेअरमन यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधला परंतु त्यांनी सुध्दा नमूद शेतकऱ्याचा ऊस तोडण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली उलट कारखाना प्रशासनाने त्यांच्या नंतरची ऊस तोडून नेली परंतु त्यांचा ऊस मात्र तोडण्यात आला नाही त्यामुळे तुकाराम शिंदे हे आर्थिक संकटात सापडले त्यामुळे कारखान्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अरेरावी पणाला आणि मनमानी कारभाराला वैतागून शेवटी त्यांना टोकाची भुमिका घ्यावी लागली कारण कारखान्याच्या भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अर्थ संबंधातील तसेच त्यांच्या जवळच्या शेतकऱ्यांची खोडवे ऊस घातली परंतु त्यांचा हा नवा ऊस घातला नाही त्यामुळे हतबल झालेल्या या शेतकऱ्याने स्वतःचा ऊस फुकुन दिला आणि कारखाना प्रशासनाच्या मनमानी भ्रष्ट कारभाराचा निषेध केला त्यामुळे या शेतकऱ्याचे जवळपास लाखाचे नुकसान झाले आहे ....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या