💥वाशिम तालुक्यातील सुपखेला साठवण तलावाच्या कामाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी...!


💥उपविभागीय जलसंधारण अधिकारी श्री.व्ही.जी.घुगे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती💥 

फुलचंद भगत

वाशिम:- जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दि.१७ फेब्रुवारी रोजी वाशिम तालुक्यातील सुपखेला ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पाझर तलावाचे साठवण तलावात रुपांतर करण्यात येत असलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषदेचे जिल्हा जलसंधारण अधिकारी श्री.एल.एस. मापारी उपजिल्हा जलसंधारण अधिकारी श्री.राजू कोठेकर, उपविभागीय जलसंधारण अधिकारी श्री.व्ही.जी.घुगे व जलसंधारण अधिकारी आर.एन.इंगळे यावेळी उपस्थित होते.


            येत्या ३१ मार्चपूर्वी पाझर तलावाचे साठवण तलावात रूपांतर करण्याचे काम पूर्ण करण्यात यावे. हे काम संबंधित कंत्राटदाराकडून चांगल्या पद्धतीने करण्यात यावे. कोणत्याही उणिवा ह्या कामामध्ये राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. षण्मुगराजन यांनी यावेळी संबंधित विभागाच्या उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.या तलावाचे साठवण तलावात रुपांतर या कामातून होणार असल्यामुळे आजूबाजूच्या जवळपास १६ हेक्‍टर शेतीला आठमाही सिंचनाची व्यवस्था हे काम पूर्ण झाल्यावर निर्माण होणार आहे....,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या