💥पुर्णा तालुक्यातील पत्रकार केदार पाथरकर राष्ट्रीय अधिमान्य पत्रकार संघ व डेली खबर कडून सन्मानित....!


💥अत्यंत निस्वार्थ अन् निष्पक्ष पत्रकारीता करीत असल्या बद्दल त्यांचा प्रशस्तीपत्र देऊन करण्यात आला सन्मान💥

पुर्णा (दि.२६ फेब्रुवारी) - तालुक्यातील पत्रकार क्षेत्रात 'डेली खबर मिडिया या वृत्तवाहीणीत कार्यरत राहून अत्यंत मेहनतीने वृत्तांकन करीत निस्वार्थ व निष्पक्षपणे जनसामान्यांच्या हक्काची जनहीतवादी पत्रकारीता करीत असतांना अत्यल्प कालावधीत 'डेली खबर मिडिया' जनसामान्यांना परिचित करून दिल्याबद्दल राष्ट्रीय अधिमान्य पत्रकार संघ व डेली खबरच्या वतीने महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातल्या पुर्णा तालुक्यातील पत्रकार केदार पाथरकर यांना प्रशस्तीपत्र देऊन नुकताच सन्मान करण्यात आला आहे.


राष्ट्रीय अधिमान्य पत्रकार संघ व डेली खबर मिडियाच्या वतीने देण्यात आलेल्या प्रशस्तीपत्रात असे नमूद करण्यात आले आहे की डेली खबर मिडिया या वृत्तवाहीणीत कार्यरत राहून आपल्या अश्याच पध्दतीने निस्वार्थ निष्पक्ष सेवा करीत राहाल डेली खबर मिडिया आपल्यासह आपल्या परिवाराच्या उज्वल भविष्याची मनोकामना करीत आहे.

त्यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल त्यांचे शहिद सरदार उधमसिंघ फाऊंडेशन व जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स परिवाराच्या वतीने शतशः अभिनंदन..... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या