💥तरोडा येथे प्रहार जनशक्ती पक्षाची शाखा स्थापन...!


💥जिल्ह्यात प्रत्येक गावात व प्रत्येक वार्डात शाखा स्थापन करून सामान्य जनतेला न्याय देण्याचे काम करण्याचा संकल्प💥 

परभणी (दि.२१ फेब्रुवारी) - प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सध्या जिल्ह्यात गाव तिथे शाखा व घर तिथे प्रहार सैनिक या अभियाना अंतर्गत ग्रामीण व शहरी भागात पक्षाच्या संगठन बांधणीचे काम जोरात सुरू असून यास तरुण वर्गाकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. सामान्य जनतेच्या प्रश्नावर पक्षाच्या वतीने घेतली जाणारी आक्रमक भूमिका सामान्य जनतेत पक्षाची प्रतिमा उंचावत आहे.

जिल्ह्यात प्रत्येक गावात व प्रत्येक वार्डात शाखा स्थापन करून सामान्य जनतेला न्याय देण्याचे काम प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने केले जात आहे याचाच एक भाग म्हणून काल दि.२० फेब्रुवारी २०२२, रविवार रोजी परभणी तालुक्यातील तरोडा येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या शाखेच्या नामफलकाचे अनावरण जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, तालुका प्रमुख बालासाहेब तरवटे, वाहतूक आघाडी तालुका प्रमुख रामेश्वर जाधव, सिंगणापुर सर्कल प्रमुख पांडुरंग शेळके, झरी सर्कल प्रमुख श्याम भोंग, मीडिया प्रभारी नकुल होगे, शहर चिटणीस वैभव संघई, सय्यद मुस्तफा, सय्यद अरमान, सय्यद नजेर यांच्या सह गावातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

तरोडा शाखा कार्यकारणी खालील प्रमाणे -

शाखा प्रमुख - गोविंद शेळके

उपशाखा प्रमुख - मुंजा खवले

सचिव - ज्ञानोबा भोपाळे

सहसचिव - संतोष शेळके

कोषाध्यक्ष - व्यंकटेश भोपाळे

संघटक - उद्धव खवले

सदस्य - कृष्णा शेळके, कैलाश राठोड, रामा दुगाने, बालासाहेब शेळके, विश्वंभर खवले, उद्धव शेळके, केशव शेळके, पप्पू शेळके...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या