💥श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालयात कर्मयोगी गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी....!


💥सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य उद्धव जमदाडे हे होते💥

फुलचंद भगत

वाशिम (दि.२३ फेब्रुवारी) :- येथील श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने कर्मयोगी गाडगेबाबा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य उद्धव जमदाडे तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. संदीप शिंदे, डॉ. सुनिता राठोड, डॉ.अरविंद बहोरपी, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा.अशोक वाघ व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले तदनंतर सामूहिक विद्यापीठ गीत गायन्यात आले. यावेळी राणी लोनसुने, शुभम गायकवाड, युवराज राठोड या विद्यार्थ्यांनी संत गाडगेबाबा यांच्या जीवनावर आधारित माहिती व कविता सादर केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक धीरज वरघट व संचालन जितेश कांबळे या विद्यार्थ्यांनी केले. डॉ. सुनिता राठोड व प्राचार्य उद्धव जमधाडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजनेच्या महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. शितल उजाडे, सह कार्यक्रम अधिकारी प्रा. सचिन इंगोले, प्रा.अतुल राऊत, प्रा.दिगंबरकुमार लांडगे,डॉ. संघरक्षित बदरगे, डॉ. देवानंद अंभोरे, प्रा.राजेश इंगोले, प्रा. ज्ञानेश्वर कवडे,प्रा. उद्धव बनकर, प्रा. अश्विन काकडे, डॉ.पूर्णीमा संधानी आदी  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अजय पठाडे या विद्यार्थ्यांने केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या