💥मंगरूळपीर येथे राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धरणे आंदोलन....!

 


 💥राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते चंद्रकात ठाकरे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेधरणे आंदोलन💥

(फुलचंद भगत)

वाशिम:-राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री ना नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ ता २४ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

याबाबत तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ना नवाब मलीक यांचा कुठलाही दोष नसतांना  केंद्र सरकारने सूडबुद्धीने कारवाई केली.सदर बाब चुकीची असून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु असून याचा आम्ही निषेध करीत असल्याचे म्हटले आहे.यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे,जिल्हा उपाध्यक्ष सुग्राम महाराज पवार,तालूका अध्यक्ष आर के राठोड,माजी पं स सभापती भाष्कर पाटील शेगीकर,जि प सदस्य दौलत इंगोले,सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाकधने,पुंजाजी मोरे,मुसा पटेल,पं स सदस्य श्रीकांत ठाकरे,रवी राऊत,मयूर ठाकरे,मुकेश मुंजे,लईक अहेमद ,इरफान शेख,संजय भोयर,अमोल पाटील,उमेश गावंडे,लल्लू गारवे,अकबर पटेल,युनूस खान,सतिष पाटील सावके,बंडू पवार,अनिल चव्हाण,विजय भोजने,संतोष गांजरे,अत्ता खान,विश्वनाथ आटपटकर,भगवान पिसोळे आदिंची उपस्थिती होती.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या