💥जिंतूर तालुका इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकारांकडून पत्र पंडित बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी...!


💥व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष पत्रकार विजय चोरडिया यांची प्रमुख उपस्थिती💥

जिंतूर/ बी.डी. रामपूरकर  

जिंतूर : पत्रकारितेचे आद्य पत्र पंडित बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती 20 फेब्रुवारी रोजी सर्व राज्यभर साजरी करण्याची राज्य शासनाचे परिपत्रक काढल्या नुसार आज महाराष्ट्र पत्रकार संघ जिंतूर तालुका इलेक्ट्रॉनिक मीडिया यांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये जिंतूर येथील शासकीय विश्रामगृहात व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष पत्रकार विजय चोरडिया यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये आज जयंती  साजरी करण्यात आली.

 यावेळी विजय चोरडिया यांनी आपले विचार मांडताना पत्रकारांच्या अनेक संघटनांच्या मागणीनुसार शासनाने दखल घेतली व 20 फेब्रुवारी रोजी राज्यभरात एकाच दिवशी सर्वत्र जयंती साजरी करा असे पत्रक काढले अशी माहिती दिली तर जिल्हा अध्यक्ष प्रदीप कोकडवार यांनी पत्रकारांच्या मागणीनुसार शासनाने जयंती साजरी करण्यासाठी शासन स्तरावरून आदेश जारी केल्याबद्दल शासनाचे आभार मानले यावेळी इलेक्ट्रॉनिक मीडिया पदाधिकारी रहीम भाई अजमत खान पठाण सचिन रायपत्रीवार बि डी रामपूरकर राम रेघाटे  संदीप माहुरकर आदि पत्रकार बांधव उपस्थित होते..,.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या