💥पुर्णा तालुक्यातील धानोरा काळे येथे विविध प्रक्षेत्रास विद्यापीठ शास्त्रज्ञांची भेट...!


💥यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत प्रकाशित कापूस दिनदर्शिका २०२२ चे वाटप करण्यात आले💥

पुर्णा/धानोरा काळे/प्रतिनिधी

          वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या कापूस संशोधन योजना कार्यालय मधील कीटकनाशक प्रतिकारशक्ती व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत प्रकाशित कापूस दिनदर्शिका 2022 चे वाटप प्रकल्पातील शेतकऱ्यांना करण्यासाठी गटचर्चा व प्रक्षेत्र भेटीचे आयोजन कृषी योद्धा शेतकरी उत्पादक कंपनी, ताडकळस च्या माध्यमातून करण्यात आले होते यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत प्रकाशित कापूस दिनदर्शिका २०२२ चे वाटप करण्यात आले यामध्ये गुलाबी बोंड आळी कीटकनाशक प्रतिकारशक्ती व्यवस्थापन याविषयी तसेच कापूस लागवडीविषयी सविस्तर व मुद्देसूद माहिती देण्यात आली आहे ज्याचा वापर करून शेतकरी कापूस लागवडीमध्ये उत्पादन वाढीसाठी फायदा घेऊ शकतील.


या वेळी कापूस संशोधन योजनेचे सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ व प्रकल्पाचे समन्वयक डॉ.डी.डी.पटाईत,  प्रकल्पाच्या वरिष्ठ संशोधन सहयोगी कु. प्रियंका वाघमारे व प्रकल्प सहायक इरफान बेग यांनी  धानोरा काळे येथील प्रयोगशील शेतकरी गजानन ढवळे यांनी लागवड केलेल्या उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादन प्रक्षेत्र तसेच कांदा मोसंबी बागेस भेट दिली तसेच येथील संग्राम काळे यांनी लागवड केलेल्या पेरू क्षेत्रास भेट दिली यावेळी डॉ. डी. डी पटाईत यांनी कीड रोग,अन्नद्रव्य व्यवस्थापन,थेट ग्राहकांना पेरू विक्री केल्यास यातून चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो असे सांगितले. या भेटी दरम्यान सोयाबीन वर पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आला त्याकरिता शेतकऱ्यांनी लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात असे सांगण्यात आले, तसेच मोसंबी फळ बागेमध्ये लाल कोळी या किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून आला त्या करिता शास्त्रज्ञांतर्फे योग्य उपाययोजना सुचविण्यात आल्या कांद्यावरील करपा याकरिता ही उपाय योजना सांगितल्या गेल्या. यावेळी  कृषी योद्धा शेतकरी उत्पादक कंपनी तर्फे वेळोवेळी अशा प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात येणार आहे असे कंपनीचे अध्यक्ष प्रताप काळे यांनी सांगितले. यावेळी  कृष्णा काळे यांच्या पॉलिहाऊस मधील टरबूज, टोमॅटो लागवडीस भेट देण्यात आली. या गटचर्चा कार्यक्रमात प्रताप काळे, उद्योजक कृष्णा काळे,  क्रिस्टल कंपनीचे प्रताप काळे प्रगतशील शेतकरी गजानन ढवळे,गोविंद काळे, सोपान ढवळे, अरविंद काळे,विश्वनाथ काळे, बालाप्रसाद काळे, उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या