💥रेणुका शुगर्सने भुमीपुत्र ऊस उत्पादकांना प्राधान्य द्यावे अन्यथा सर्व पक्षीय नेते ऊस उत्पादक रस्त्यावर उतरणार....!


💥रेणूका शुगर्स विरोधात रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा एका प्रसिद्धी पत्रका व्दारे देण्यात आला आहे💥

किरण घुंबरे पाटील

पाथरी:-परभणी जिल्ह्यात सहा साखर कारखाने असून सहा ही खाजगी तत्वा वरील साखर कारखाने असुन यातील बहुतांशी साखर कारखाने हे तालुक्यातीलच उस उत्पादकांच्या उस गाळपाला प्राधान्य देत आहेत मात्र पाथरीचा रेणुका शुगर्स बाहेरील उसाचे गाळप करत असल्याने ऊस उत्पादक शेतक-यां मध्ये संतापाची लाट आली असून स्थानिक शेतक-यांचा प्राधान्याने उस गाळप व्हावा २३ फेब्रुवारी बुधवारी रात्री बारा पर्यंत बाहेरील सर्व टोळ्या पाथरी तालुक्यात आणाव्या अन्यथा सर्व पक्षीय नेते ऊस उत्पादक शेतकरी आंदोलना साठी २४ फेब्रुवारी गुरूवारी सकाळी रेणूका शुगर्स विरोधात रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा एका प्रसिद्धी पत्रका व्दारे दिला आहे.


२०१९ पासून तालुक्यात चांगला पाऊस झाला.मागिल तीन वर्षात सतत अतिवृष्टी झाल्याने खरीपातील कापुस,मुग,सोयाबीन,उडीद आणि अन्य पिकां पासून उत्पादन कमी मिळाले परंतू पाण्याची उपलब्धता झाल्याने शेतकरी ऊसाचे पिक खर्चीक असले तरी हमीचे पिक असल्याने या पिका कडे वळले. त्यात तालुक्यातील गोदावरी नदी वरील मुदगल,तारुगव्हाण आणि ढालेगाव शिवाय नाथरा येथील बंधारे तुडूब भरलेली यात संपुर्ण तालुक्याला जायकवाडीचे पाणी मिळत असल्याने सहाजिकच ऊसाचे क्षेत्र वाढले. मात्र आता ऊसाच्या पिकाला तुरे आले तरी पाथरीचा रेणूका शुगर्स ऊस नेत नाही. या साखर कारखाण्याचा शेतकी विभाग बाहेरील तालुक्यातून गाळपा साठी ऊस आणत असल्याने स्थानिक ऊस उत्पादक शेतकरी संतप्त होत आहेत. यात जयमहेश आणि गंगाखेड शुगर्स ने स्थानिक ऊस उत्पादकांना प्राधान्य देत पाथरी तालुक्याती ऊसतोडी बंद केल्याने ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल होऊन नेत्यांच्या घरी चकरा मारत आहेत. या साठी आता सर्व पक्षिय नेते आणि ऊस उत्पादकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले असून पाथरीच्या रेणुका शुगर्स ने बाहेरील तालुक्यात सुरू असलेली ऊसतोड बुधवार २३ फेब्रुवारी रात्री बारा पर्यंत बंद करून सर्व टोळ्या तालुक्यात आणाव्या अन्यथा २४ फेब्रुवारी रोजी सकाळी कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालय परिसरातून सर्वपक्षिय नेते आणि ऊस उत्पादक शेतकरी रेणूका शुगर्स विरोधात भव्य मोर्चा काढणार असल्याचे प्रसिद्धी पत्रक काढण्यात आले आहे. आता या साठी रेणूका शुगर्स नेमकी आज बुधवारी कोणती भुमिका घेते हे पहाणे महत्वाचे असणार आहे. या साखर कारखाण्याच्या ऊस तोडीचे नियोजन कोलमडले असल्याचे शेतकरी  सांगत आहेत. कोड काढणे,ऊसतोड सुरू करणे,ऊस आणण्या साठी तोडणी कामगार ऊस उत्पादकांची पिळवणूक करत असल्याचे ही उघडपणे बोलले जात आहे.ऊसाला तुरे आलेले असतांना ऊस तोड सुरू होत नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी हताष झाल्याचे चित्र तालुक्यात दिसत असुन आंदोलन नेमके कसे असेल हे गुरूवार २४ फेब्रुवारी रोजी दिसून येणार आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या