💥समस्येचे निराकरण करणारा खरा विजेता असतो - ॲड.आ. किरणराव सरनाईक


💥सरनाईक समाजकार्य महाविद्यालयाची यशाची परंपरा कायम💥

फुलचंद भगत

वाशीम - संत गाडगे बाबा अमरावती विद्यापिठाच्या वतीने उन्हाळी २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या समाजकार्य पदवी व पारंगत पदवी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या निकालामध्ये श्री. रामराव सरनाईक समाजकार्य महविद्यालयाने १९९३ सालापासून आपली यशाची परंपरा कायम ठेवत याही वर्षी दहा विद्यार्थ्यांनी गुणवत्ता प्राप्त केली आहे. आजपर्यंत एकाही वर्षी मिरीटचा क्रम चुकलेला नाही हे महाविद्यालयाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. अशा गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचे अध्यक्ष व श्री.शिवाजी शिक्षण संस्था वाशिमचे अध्यक्ष तथा अमरावती विभागीय शिक्षक आमदार अँड. किरणराव सरनाईक हे होते तर संस्थेचे उपाध्यक्ष अरूणभाऊ सरनाईक, स्थानिक विकास समितीचे अध्यक्ष स्नेहदीप सरनाईक, प्रा.भास्कर सोनुने, प्रा.विजय पोफळे, प्राचार्य डॉ. किशोर वाहाणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

    समाजकार्य पारंगत पदवी (एम.एस.डब्ल्यू.) परीक्षेत विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत कु. तेजल शर्मा हिने व्दितीय क्रमांक मिळवला असून कु. संध्या शिंदे हिने आठव्या स्थानी येण्याचा मान मिळवला आहे. तसेच समाजकार्य स्नातक पदवी (बि.एस.डब्ल्यू.) परीक्षेच्या गुणवत्ता यादीत कु. कल्याणी कांबळे हिने व्दितीय क्रमांक प्राप्त केला असून सोपान पवार हा तृतीय, कु.वैष्णवी शर्मा व कु. रूपाली आडे यांचा संयुक्त पाचवा, संजय नेहूल हा सहावा, कु.प्रणिता चिपडे ही सातवी, कु.मयुरी अवताडे हि नववी व कु. प्रांजली राठोड दहाव्या स्थानी येण्याचा मान प्राप्त झाला. या गुणवंत व यशवंत विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र देवुन शिक्षक आमदार अँड. किरणराव सरनाईक यांच्या हस्ते व ईतर मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या. तसेच अमरावती विद्यापिठाची इंग्रजी विषयात आचार्य पदवी प्राप्त केल्याबद्दल प्रा.डॉ. गजानन हिवसे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात शिक्षण आमदार अँड. किरणराव सरनाईक यांनी यश व गुणवत्तेच्या बाबतीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना समस्येचे निराकरण करून जो यश संपादन करतो तो खरा विजेता असतो. या स्पर्धेच्या काळात यश मिळविण्यासाठी जिद्द, सातत्य व मेहनत यांची गरज असून या करोना काळात धैर्यशीलता खुप महत्वाची आहे. शिक्षण, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या समस्या सोडविण्यासाठी मी अमरावती विभागीय शिक्षक संघाचे काम करतो. या माध्यमातूनच मी पुढील काळातील शिक्षणाच्या समस्या सोडविण्याचा अथक प्रयत्न करेल.

    याप्रसंगी अरूणराव सरनाईक यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील यशासाठी शुभेच्छा देवून त्यांचा गुणगौरव केला. तसेच स्नेहदिप सरनाईक यांनी हे गुणवंत विद्यार्थी महाविद्यालयाचे अनमोल रत्न असून त्यांच्यामुळेच महाविद्यालयाचा नावलौकिक वाढला आहे असे मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या या यशात महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा महत्वाचा वाटा आहे. या सत्कार कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.गजानन बारड यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ. संजय साळवे यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या