💥सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी बुद्ध विहारात शिवजयंती - प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे रिपब्लिकन युवासेना


💥बुद्ध विहारात शिवजयंती ; पारावर भिमजंयती उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद💥


औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली

दोन समाजातील सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी बुद्ध विहारात शिवजयंती साजरी करण्यात आल्याची माहिती युवा प्रदेशाध्यक्ष सरपंच किरण घोंगडे,सुभम सोळंके यांनी दिली.शिव, फुले,शाहु, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात सध्या काही सनातनी लोक जाणिवपूर्वक व्देष पसरवीत असुन महापुरुष जातित मर्यादित करत आहेत.याला शह देण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील नेते तथा रिपब्लिकन युवासेना प्रदेशाध्यक्ष सरपंच किरण घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली येहळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते शुभम सोळंके यांनी हा सामाजिक सलोखा ऐक्य कार्यक्रम राबविण्यात यावा असे आवाहन केले होते.


आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला असुन औंढा नागनाथ तालुक्यातील अंजनवाडा,येहळेगाव,काकाडदाबा,जडगाव,निशाणा,बोरजा,असोला  सह दहा गावात उत्साहात बुद्ध विहारात छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा लावुन हार अर्पण करून साजरी करण्यात आली संकल्प पुर्ण करण्यासाठी रिपब्लिकन युवासेना प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे, युवा नेते शुभम सोळंके, गजानन सोळंके पाटील,दतराव लोंढे पाटील, पंजाबराव राठोड, बालाजी कर्डीले,सचीन सोळंके पाटील, पंडित सुर्यतळ आदींनी परिश्रम घेतले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या