💥पुर्णा तालुक्यातील पांगरा ढोणे गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 80 फूट जलकुंभावर आमरण उपोषण....!


💥संभाजी राजेंच्या उपोषणाला पाठिंबा ; महाराजांचे उपोषण सुटणार नाही तोपर्यंत खाली न उतरण्याचा तुकाराम ढोणेंनी पवित्रा💥


संभाजीराजेंनी आझाद मैदानावर मराठा अरक्षणप्रश्नी उपोषण सुरू केल्यानंतर महाराजांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून सर्वत्र विविध संघटना आणि मराठा बांधवांच्या वतीने पाठिंबा दर्शविला जातोय. परभणीचे अण्णा हजारे म्हणून ज्यांची ओळख आहे. त्या तुकाराम ढोणे यांनी त्यांच्या गावातील 80 फूट जलकुंभावरून उपोषण सुरू करीत संभाजी राजेंच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवलाय तुकाराम ढोणे यांचे उपोषणाचे स्थळ नेहमीच लक्षवेधी राहिलेली आहेत,त्यांनी यापूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी,कोरड्या विहरित,वाहत्या नदीच्या तराफयावर बसून,सरण रचून उपोषणे केली आहेत.


त्यांच्या उपोषणाला नेहमीच गावकऱ्यांनी पाठिंबा राहिला आहे,आता त्यांनी त्यांच्या मूळ गावी पांघरा ढोणे येथिल 80 फूट उंच जलकुंभावर चढून उपोषण सुरू केलय.यावेळी गावकऱ्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळालच पाहिजे यासाठी घोषणा देत संभाजी महाराजांच्या उपोषणाला पाठिंबा देत मराठा समाजाला आरक्षण द्या अशी मागणी केलीये. जोपर्यंत संभाजी महाराजांच उपोषण सुरू आहे,तोपर्यंत जलकुंभावरून खाली न उतरविण्याचा पवित्रा तुकाराम ढोणे या उपोषण कर्त्याने घेतलाय. पोलीस त्यांना जलकुंभावरून खाली उतरून इतरत्र उपोषण करण्याची विन्नती करीत आहेत.पण सदर इसम जलकुंभावर बसूनच लक्षवेधी उपोषण करण्याच्या पवित्र्यात आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या

  1. मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे हि सर्व मराठा बांधवाची मागणी आहे त्यासाठी संसदेतील, विधानसभा व विधानपरिषद सर्व राजकीय आमदार, खासदार यांनी राजीनामे दयावेत संभाजीराजेसारखे मराठे नेत्यांनी एकजूट दाखवावी हि विनंती.

    उत्तर द्याहटवा
  2. छत्रपती संभाजीराजेंना मानाचा मुजरा. त्रिवार अभिवादन

    उत्तर द्याहटवा
  3. तुकाराम ढोणे सैदव हया लढ्यात सहभागी असतात. एक मराठा लाख मराठा

    उत्तर द्याहटवा