💥मंगरूळपीर नगरपरिषदेकडुन No vaccine,no mask....No entry नियम...!


💥त्यामुळे कोरोणा प्रतिबंधक लसिकरणाचा आकडाही वाढायला मदत होणार असल्याचे दिसते💥

✍️फुलचंद भगत

वाशिम:-मंगरूळपीर नगरपरिषदेकडुन आता कोरोणाप्रतिबंधक ऊपाययोजनेसाठी यंञणा अॅक्शन मोडवर आली असुन आता मंगरुळपीर नगरपरिषद कार्यालयात दररोज प्रशासकिय कामानिमित्य येणार्‍या सर्व अधिकारी,कर्मचारी तसेच नागरिकांनाही विना कोरोनाप्रतिबंधक लस न घेणारास तसेच विनामास्क असणारासही आता या कार्यालय प्रवेश मनाई करण्यात आली आहे.यामुळे आता लोक सतर्क होवुन कोरोनापासुन आपला बचाव करण्यासाठी फायदा होणार आहे व कोरोणा प्रतिबंधक लसिकरणाचा आकडाही वाढायला मदत होणार असल्याचे दिसते.

       मंगरूळपीर न.प.कडून सुरुवातीपासुनच कोरोणा महामारी रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक ऊपाययोजनांवर भर देवून शहर कोरोनामुक्त ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात आले.मुख्याधिकारी यांच्या सुचनेवरुन विविध ऊपाययोजना व जनजागृती करुन कोरोना प्रतिबंधक लसिकरणाचाही वेग न.प.यंञणेने वाढविला.आरोग्य व स्वच्छता विभाग प्रमुख राजेश संगत आणी त्यांच्या सहकार्यांनी लोकांमध्ये जनजागृती करून या महामारीला रोखण्यासाठी ऊपाययोजना केल्या.पुन्हा एकदा कोरोनाने मंगरुळपीर शहरात डोके वर काढल्याने प्रशासनाकडुन सतर्कता ठेवण्यात येत आहेत.दि.७ जानेवारी रोजीपासुन आता मंगरूळपीर नगरपरिषद कार्यालयात विनामास्क आणी विना व्हॅक्शिनेशन असलेल्या अधिकारी,कर्मचारी तसेच नागरीकांना कार्यालयात प्रवेश मनाई करण्यात आली आहे.न.प.प्रशासन आता अॅक्शन मोडवर आली असुन लोकांनीही प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.या पथकामध्ये रमेश श्रृंगारे,कैलास टांक,डाॅ.अजमल आणी त्यांचे आरोग्य पथक,आरोग्य निरिक्षक राजेश संगत आणी न.प.कर्मचारी यांचा या जनजागृती पथकामध्ये समावेश आहे.


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या