💥पुर्णा तालुक्यातील कानखेड ग्रामपंचायतीच्या सरपंचाचा मागासवर्गीय ग्रामपंचायत सदस्यावर हल्लाबोल.....!


💥डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागेवर सरपंचाचा डोळा ; ॲक्ट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल💥

पुर्णा (दि.२१ जानेवारी) तालुक्यातील मौ.कानखेड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पुतळ्यासाठी राखीव असलेल्या गायरान जागे संदर्भातील वाद विकोपाला जाऊन येथील ग्रामपंचायच्या जातीयवादी सरपंचाने भावाच्या मदतीने मागासवर्गीय ग्रामपंचायत सदस्यावर हल्लाबोल करीत बेदम मारहाण करून जातीयवादी शिविगाळ केल्याची घटना दि.१७ जानेवारी २०२२ रोजी दुपारी ०२-३० वाजेच्या सुमारास घडली या घटने संदर्भात पिडीत फिर्यादी ग्रामपंचायत सदस्य अशोक भगवानराव वाघमारे वय वर्षे ३० रा.कानखेड यांनी दि.२१ जानेवारी २०२२ रोजी दिलेल्या फिर्यादी वरून आरोपी सरपंच व त्याच्या भावा विरोधात पुर्णा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटने संदर्भात सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील मौ.कानखेड गावातील मागासवर्गीय बौध्द वसाहत असलेल्या गायरान जागेवरील काही जागा ग्रामपंचायत प्रशासनाने महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पुतळ्यासाठी राखीव ठेवण्यात आलेली सदरील जागेवर जातीयवादी सरपंच सालपे यांचा डोळा असून या जागे संदर्भात सरपंच सालपे व ग्रामपंचायत सदस्य अशोक वाघमारे यांच्यात मागील दोन अडीच वर्षापासून जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांच्या न्यायालयात वाद चालू आहे.
दरम्यान हा वाद दि.१७ जानेवारी २०२२ रोजी पुर्णा पंचायत समितीचे एक पथक चौकशीसाठी कानखेड येथे आले व चौकशी करून निघून गेल्यानंतर सदरील वाद विकोपाला जाऊन जातीयवादी सरपंच तुकाराम सखाराम सालपे व त्यांचा भाऊ सुजान सखाराम सालपे यांनी ग्रामपंचायत सदस्य अशोक वाघमारे यांना गावातील बौध्द विहारा जवळ गाठून मी गावचा सरपंच आहे सदरील जागा आमची आहे असे म्हणून दोघा भावांनी जातीयवाचक शिविगाळ करून लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण केली यावेळी गावातील काही लोकांनी मध्यस्थी करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला यावेळी सरपंच सालपे याने तु जर  पोलिसात तक्रार केली तर तुला हत्या करेल अशी धमकी दिली या संदर्भात पिडीत फिर्यादी अशोक भगवानराव वाघमारे यांनी पुर्णा पोलिस स्थानकात दिलेल्या रितसर  तक्रारी वरून सरपंच तुकाराम सालपे व त्याचा भाऊ सुजान सालपे यांच्या विरोधात कलम ३२३,५०४,५०६,३४ भादवीसह ॲक्ट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

💥कानखेड ग्रामपंचायतचे सरपंच तुकाराम सालपेच्या मुजोरपणाचे अनेक किस्से💥


पुर्णा शहरापासून अवघ्या चार ते पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या पुर्णा नदीपात्रावरील कानखेड या गावाचे सरपंच असलेल्या तुकाराम सालपे यांच्या मुजोरपणाची अनेक प्रकरण समोर आली असून नदीपात्रातील वाळू तस्करीपासून ते पत्रकारांना धमक्या देण्यापर्यंत संबंधित सरपंचाने मजल गाठली असून यापुर्वी सुध्दा गावातील विकासा संदर्भात वृत्तांकन करण्यास गेलेल्या एका मागासवर्गीय पत्रकाराला अत्यंत खालच्या स्तराला जाऊन या सरपंचाने शिविगाळ व धमकावल्याचा प्रकार समोर आला होता परंतु संबंधित पत्रकाराने समजदारी दाखवल्यामुळे प्रकरण क्षमले होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या