💥अकोला जिल्ह्यातील तेल्हारा येथे पत्रकार दिनी जेष्ठ पत्रकार सन्मान सोहळ्यासह विविध उपक्रमांचे आयोजन...!


💥तेल्हारा येथील पत्रकार संघाचा कौतुकास्पद उपक्रम💥

अकोला (दि.०३ जानेवारी) - जिल्ह्यातील तेल्हारा येथील तेल्हारा पत्रकार संघाचे वतीने येथील माहेश्वरी भवन मध्ये ६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता पत्रकार दिनाचे औचित्य साधून जेष्ठ पत्रकारांचा सन्मान सोहळा व विविध स्पर्धा आयोजित केल्या आहेत.


अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न अकोला जिल्हा पत्रकार संघ शाखा तेल्हारा तालुका पत्रकार संघाचे वतीने आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरु केलेल्या दर्पण नियतकालिके चे स्मरण म्हणून ६ जानेवारी पत्रकार दिन  तेल्हारा येथील माहेश्वरी भवनात तालुक्यातील जेष्ठ पत्रकारांचा कार्यगौरव "दिवंगत पत्रकार,संपादक, साहित्यिक प्रभाकरराव सावरकर स्मृती जीवनगौरव पुरस्कार " देवून करण्यात येणार आहे तसेच यावेळी विविध क्रीडा स्पर्धा व गोरगरीब अनाथांना अन्नदान कार्यक्रम सुद्धा राहणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रल्हादराव ठोकणे तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. संतोष येवलीकर (तहसीलदार तेल्हारा),राजेश गुरव (ना.तहसीलदार),ज्ञानोबा फंड (पो.नि.तेल्हारा),धिरज चव्हाण (पो.नि.हिवरखेड),गोपीचंद पवार(मुख्याधिकारी न.प.तेल्हारा),लिंबाजी बारगीरे (गटविकास अधिकारी),मिलिंद वानखडे(ता. कषी अधीकारी),भरत चव्हाण, डॉ. अशोक तापडीया (वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रूग्णालय), दिपक राठोड (विजवितरण),

डॉ. गोपाल ढोले(प्राचार्य गो.खे.महाविद्यालय) उपस्थित राहणार आहेत यावेळी तालुक्यातील जेष्ठ पत्रकार प्रल्हादराव ठोकणे,सुरेशराव शिंगणारे,रमेशपंत गोयनका, मनोहरराव गोलाईत,दत्तात्रय बिहाडे,डॉ. संतोष ताकोते यांचा कार्यगौरव सन्मान करण्यात येईल असे तेल्हारा तालुका पत्रकार संघाचे प्रल्हादराव ठोकणे, सुरेशराव शिंगणारे, सत्यशील प्र. सावरकर, अनंतराव अहेरकर,प्रा. कष्णा फंदाट,रामभाऊ फाटकर, सदानंद खारोडे,धर्मेश चौधरी, प्रशांत विखे,अनिल जोशी, प्रा.विद्याधर खुमकर, अनिल अवताडे, निलेश जवकार,रवि शर्मा,दत्तात्रय बिहाडे, शामशील भोपळे, बसवेश्वर मिटकरी,सुरेश सिसोदिया,अमित काकड, राहूल मिटकरी,विशाल नांदोकार यांच्यासह मराठी पत्रकार परिषद जिल्हा प्रसिद्धी प्रमुख निलेश जवकार यांनी कळविले आहे.....





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या