💥सरस्वती विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदी लक्ष्मण मादरपल्ले तर उपमुख्याध्यापक पदी वंदना बंगाळे....!


💥याप्रसंगी विद्यालयाच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला💥


गंगाखेड (प्रतिनिधी ) - शहरातील सरस्वती विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी लक्ष्मण मादरपल्ले तर उपमुख्याध्यापक पदी वंदना बंगाळे यांची सेवाज्येष्ठतेनुसार दिनांक 1 जानेवारी 2022 रोजी नुकतीच नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी विद्यालयाच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.


 तसेच व्यंकटेश विद्यालयाचे मुख्याध्यापक दिलीप जोशी व त्यांचे सहकारी  तसेच सरस्वती विद्यालय प्राथमिक विभाग,  शिक्षकेतर कर्मचारी यांनीदेखील त्यांचे स्वागत करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी विद्यालयातील शिक्षक आघाडीचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख गोपाळ मंत्री ,सांस्कृतिक विभाग प्रमुख अनंत काळे ,विद्यालयाचे पर्यवेक्षक रमेश गिराम, प्राथमिक चे मुख्याध्यापक तुकाराम कांगणे, बाळासाहेब राखे, अरुण पाठक आदींची प्रमुख उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या