💥गुरुद्वारातील मीत जत्थेदार संतबाबा ज्योतिंदरसिंघजी यांनी वाहेगुरुचे स्मरण करून अरदास विधी पार पाडण्यात आली💥
नांदेड (दि.25 जानेवारी) : राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा. शरदचंद्रजी पवार यांना नुकतेच कोविड संक्रमण सकारात्मक आल्याचे त्यांनी स्वतः माहिती कळवून दिली. त्यामुळे राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यात देखील अस्वस्थता पसरली. नांदेड येथील राष्ट्रवादी युवक कांग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष स. लखनसिंघ लांगरी यांनी गुरुद्वारा तखत सचखंड हजूर साहेब या पावन स्थळी उपस्थित होऊन श्री शरदचंद्र पवार यांच्या प्रकृतित सुधारणा होण्या साठी अरदास (प्रार्थना ) केली.
आज मंगळवार दि.२५ जानेवारी रोजी सायंकाळी तखत सचखंड गुरुद्वारातील मीत जत्थेदार संतबाबा ज्योतिंदरसिंघजी यांच्या तर्फे वाहेगुरुचे स्मरण करून अरदास विधी पार पाडण्यात आली. सरदार लखनसिंघ लांगरी यांनी आपल्या भावना व्यक्त करत प्रार्थना केली की मागील सहा ते सात दशकापासून मा. शरदचंद्र पवार साहेब देश, राज्य आणि सामान्य माणसांच्या सेवेसाठी सक्रिय आहेत. त्यांनी आपल्या जीवनात अनेक मोठ्या जवाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. तसेच राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या विस्तारासाठी व समृद्धि साठी त्यांचे नेतृत्व व मार्गदर्शन कायम आहे. पक्ष समृद्धि आणि विस्तारासाठी मा. शरदचंद्र पवार साहेबांना उत्तम आरोग्य आणि दीर्घाऊ प्राप्त होऊ दे अशी प्रार्थना देखील त्यांनी केली.....
0 टिप्पण्या