💥माईंच्या जाण्याने समाजाचा ऊर्जास्त्रोत हरवला - डॉ.सूर्यकांत मुंडे


💥वैद्यनाथ नर्सिंग इन्स्टिट्यूट व मराठवाडा पब्लिक स्कुल येथे पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली💥 

💥माईंच्या जाण्याची पोकळी काशानेच भरून निघणार नाही - प्रशांत प्र.जोशी 

परळी वैजनाथ येथील वैद्यनाथ नर्सिंग इन्स्टिट्यूट व मराठवाडा पब्लिक स्कुल येथे येथे अनाथांची माय अशी ख्याती असलेल्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मंगळवारी रात्री त्यांचे एका आजाराने निधन झाले होते. सिंधुताई सपकाळ आणि परळी शहराचे एक घनिष्ठ नाते होते.

सिंधुताई सपकाळ यांच्या कामाची उंची कोणीही आणि कधीही गाठू शकत नाही. परळी वैजनाथ आणि माई यांचे घनिष्ठ नाते होते. खुप काष्ठातून त्यांनी मोठे कार्य उभे केलेले आहे, राज्यालाच नाही तर देशाला त्यांचा अभिमान आहे. माईंच्या जाण्याने देशाची आणि समाजाची खूप मोठी हानी झाली आहे, ती कशानेही भरून निघू शकत नाही असे प्रतिपादन याप्रसंगी जेष्ठ पत्रकार प्रशांत प्र. जोशी यांनी केले. तर संस्थेचे अध्यक्ष डॉ.सूर्यकांत मुंढे म्हणाले की, माईंनी समाजासमोर सामाजिक कार्याचा खूप मोठा आदर्श निर्माण केलेला आहे. मायेची आणि आपुलकीची शिकवण त्यांनी येणाऱ्या कित्येक पिढ्यांना दिलेली आहे. त्यांच्या जाण्याने समाजाचा मोठा ऊर्जास्त्रोत हरवला आहे असे ते म्हणाले. बुधवारी दुपारी 1 वाजता वैद्यनाथ नर्सिंग इन्स्टिट्यूट येथे पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आले. मान्यवरांनी शोकभवना व्यक्त केल्यानंतर इन्स्टिट्यूटचे सर्व विद्यार्थी, स्टाफ आणि उपस्थितांनी दोन मिनिटे स्तब्ध राहून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी डॉ.सूर्यकांत मुंढे, जेष्ठ पत्रकार प्रशांत जोशी, दत्तात्रय काळे, संभाजी मुंडे, महादेव शिंदे, सुरेश नाना फड, अंकुश फड, शेख सर, प्राचार्या ताई परळीकर, गुणप्रिय मॅडम, राम सर, मराठवाडा पब्लिक स्कुलने प्राचार्य आयाचित सर व शिक्षक वृंद उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या