💥अनाथांची माय पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचं निधन : भावपूर्ण श्रद्धांजली....!


💥औरंगाबादेतील तापडिया नाट्यमंदिरात दैनिक जनपत्रतर्फे जनभूषण सन्मानाने गौरविण्यात आले होते💥

सिंधूताईंना १७ मार्च २०१३ रोजी औरंगाबादेतील तापडिया नाट्यमंदिरात दैनिक जनपत्रतर्फे जनभूषण सन्मानाने गौरविण्यात आले होते. सिंधूताईंनी यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधी आणि मान्यवरांसमोर त्यांना भोगावा लागलेला त्रास, जीवनपट मांडून स्तब्ध केले होते. 


या कार्यक्रमापूर्वी सदर सोहळ्याचा आयोजक  म्हणून एखादा वयाने ज्येष्ठ संपादक व्यक्ती असेल असे  सिंधूताईंना वाटले होते. मात्र ज्यावेळी त्यांची आणि माझी प्रत्यक्ष भेट सोहळ्यापूर्वी झाली त्यावेळी त्यांनी माझे वय  विचारले . माझे ३३ वय असल्याचे सांगताच त्या आश्चर्यचकीत झाल्या होत्या याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या सुरूवातीला माझी मुलगी आजी पत्नी आणि आई या चौघींसोबत सिंधूताईंनी शेजारी बसवून छायाचित्र काढले होत तसेच पत्रकारांच्या बायकांना संसारात काय त्रास असतो, याबद्दल टिप्पणी करत मायेचा उपदेश दिला होता....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या