💥परळी येथील वैद्यनाथ साखर कारखान्याचे अखेर ऊस गाळप उद्यापासुन होणार सुरु...!


💥तांत्रिक अडचणीमुळे वैद्यनाथ कारखाना सुरू करण्यास विलंब झाला आहे💥

परळी : भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस आणि माजी मंत्री पंकजा मुंडे ह्या चेअरमन असलेला परळीचा वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना ऊस गाळप करण्यासाठी सज्ज झाला आहे. कारखाना प्रशासनाच्या माहितीनुसार अखेर उद्या गुरूवार दि.०६ जानेवारी पासून प्रत्यक्ष ऊस गाळप सुरू होणार असल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

तांत्रिक अडचणीमुळे वैद्यनाथ कारखाना सुरू करण्यास विलंब झाला आहे. कारखान्याच्या चेअरमन पंकजा मुंडे यांनी वेळोवेळी लक्ष घालून बंद असलेला कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. महिनाभराच्या तांत्रिक दुरुस्त्या, कामकाजानंतर ऊस गाळपासाठी कारखाना सज्ज झाला आहे. आज (दि.५) सायंकाळपर्यंत कारखाना अंतर्गत टेस्टिंगच्या सर्व प्रक्रिया पूर्ण होतील. त्यानंतर उद्या (दि.६) सकाळपासून वैद्यनाथ कारखान्याचे प्रत्यक्ष गाळप सुरू होईल. याला चेअरमन पंकजा मुंडे यांच्या प्रसिद्धी विभागाकडून देखील दुजोरा देण्यात आला. परंतु, कारखान्याचे कार्यकारी संचालक जे.पी.एस. दिक्षीतुल्लू यांच्याशी संपर्क होऊ न शकल्याने त्यांचे म्हणणे अधिकृतपणे समजू शकले नाही.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या