💥पुर्णेतील श्री गुरु बुद्धीस्वामी महाविद्यालयाचे प्रा.डॉ.राजीव यशवंते यांची राज्य शासनाच्या भाषा सल्लागार समितीवर निवड...!


💥त्यांच्या या निवडीबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष श्री प्रमोद एकलारे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे💥

पूर्णा: राज्य शासनाच्या मराठी भाषा सल्लागार समीतीची पुनर्रचना करण्यात आली आहे. जेष्ठ साहित्यिक श्री लक्ष्मिकांत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या सल्लागार समितीवर पूर्णा येथील श्री गुरु बुद्धीस्वामी महाविद्यालयाच्या मराठी विभागातील प्राध्यापक डॉ. राजीव यशवंते यांची निवड झाली आहे. 

त्यांच्या या निवडीबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष श्री प्रमोद एकलारे, सचिव प्रा. गोविंदराव कदम, सहसचिव श्री अमृतराज कदम, संचालक श्री उत्तमरावजी कदम, डॉ. दत्तात्रय वाघमारे, श्री. साहेबरावजी कदम यांनी त्यांचे कौतुक केले. तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. राजकुमार, उपप्राचार्य डॉ. संजय दळवी, उपप्राचार्य डॉ. शेख फातेमा मॅडम. प्रा.मिटकरी, प्रा.शेजूळ, डॉ. शिवसांब कापसे, कार्यालयीन अधिक्षक श्री डुब्बेवार यांनी अभिनंदन केले आहे. 

मराठी भाषेच्या विकास आणि प्रचारासाठी ही समिती पुढील तीन वर्ष कार्य करेल. यानिमित्ताने ग्रामीण भागातील महाविद्यालयात कार्य करणाऱ्यास  मोठी संधी दिल्यावरून सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. अशातच  महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. वेदप्रकाश डोणगावकर यांनी डॉ. राजीव यशवंते यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या