💥बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी चंद्रकांत बर्दे ; अरुण जैन यांनी सोपवला पदभार...!


💥या बैठकीच्या अध्यक्षस्थानी परिषदेचे उपाध्यक्ष राजेंद्र काळे हे होते💥

✍️ मोहन चौकेकर 

बुलढाणा : मराठी पत्रकार परिषद, मुंबईशी संलग्नीत बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ‘दै.विश्वविजेता’चे संपादक चंद्रकांत बन्सीलाल बर्दे यांची परिषदेच्या नियमानुसार कार्याध्यक्ष पदावरुन बढती करण्यात आली आहे. २०२२ या नववर्षाच्या पहिल्याच दिवशी २ वर्षाचा कार्यकाल संपताच, अरुण जैन यांनी चंद्रकांत बर्दे यांच्याकडे अध्यक्ष पदाचा पदभार हस्तांतरीत करुन त्यांचे स्वागत केले या बैठकीच्या अध्यक्षस्थानी परिषदेचे उपाध्यक्ष राजेंद्र काळे हे होते.

अनेक संघटनांमध्ये एकीकडे पदाला चिकटून राहण्याची परंपरा असतांना, मराठी पत्रकार परिषदेने मात्र अध्यक्षांचा विहीत कालावधी आटोपताच, कार्याध्यक्षांकडे आपोआपच अध्यक्षपदाची सुत्रे जातील अशी घटनेत तरतूद करुन ठेवली आहे. त्याच घटनात्मक परंपरेचे पालन गत ६ वर्षांपासून बुलडाणा जिल्हा पत्रकार संघ करत आहे. राजेंद्र काळे यांनी कार्यकाळ संपताच, तत्कालीन कार्याध्यक्ष सुधीर चेके पाटील यांच्याकडे अध्यक्षपदाची सुत्रे सोपविली होती. चेके पाटील यांच्या कार्यकाळात कार्याध्यक्षपदाची नियुक्ती न होवू शकल्याने, २०१८ला अध्यक्षपदासाठी थेट निवडणूक जाहीर करण्यात आली. त्यात अरुण जैन यांची अध्यक्षपदी तर कार्याध्यक्षपदी निवड झाली. त्यामुळे जैन यांनी त्यांचा कार्यकाल आटोपताच, बर्दे यांच्याकडे अध्यक्षपदाची सुत्रे आज शनिवार १ जानेवारी रोजी सोपविल्या गेली. बर्दे हे डिसेंबर २०२३ पर्यंत अध्यक्षपदी राहतील.

नवनियुक्त अध्यक्ष हे मराठी पत्रकार परिषदेला विश्वासात घेवून बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाची नवीन कार्यकारणी गठीत करतील. यावेळी निवडला जाणारा ‘कार्याध्यक्ष’ हा २ वर्षांनी बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाचा अध्यक्ष बनेल दरम्यान,नवनियुक्त जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बर्दे यांचे मराठी परिषदेचे विश्वस्त एस.एम.देशमुख व किरण नाईक तथा अध्यक्ष गजानन नाईक, उपाध्यक्ष राजेंद्र काळे यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत. येत्या २६ जानेवारीच्या आत कार्याध्यक्षांसह नवीन कार्यकारिणी गठीत करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत.. असे एका प्रसिद्धी पत्रकान्वये मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय प्रसिद्धी प्रमुख अमर राऊत व जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मोहन चौकेकर यांनी कळविले आहे....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या