💥जिंतूर ग्रामीण रुग्णालयात सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागरगोजे यांच्या कडे मागणी....!


💥जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांची आज ग्रामीण रुग्णालयाला अचानक भेट💥

जिंतूर (दि.०४ जानेवारी) - जिंतुर शहरातील ग्रामीण रुग्णालयातील असुविधेच्या विविध समस्या पाहता आज जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांच्या सोबत प्रत्यक्ष भेट देवून स्थानिक ग्रामीण रुग्णालयात येऊन संपूर्ण रुग्णालयात प्रत्येक कक्षाची पाहणी केली.व तेथील सर्व असुविधेचा पंचनामा करत रुग्णालयातील ज्या-ज्या बाबीची कमतरता आहे त्या बाबत विचारणा करत तत्काळ सर्व सुविधा पुरवन्याची मागणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागरगोजे यांच्या कडे मागणी केली.

ज्यात विशेषता रुग्णालयात सर्व साधन साम्रगी उपलब्ध आहे.पन विविध तज्ञ असलेल्या मनुष्यबळाची कमतरता दिसून आली. आर्थोपेडिक सर्जन, डेटालिस्ट,ऑनेस्टीची उनिव ज्या शिवाय तत्काळ ऑपरेशन करने शक्य नसल्याचे उघड़ झाले.सदर ग्रामीण रुग्णालयात सर्व सुविधा कागदोपत्रीच असुन प्रत्यक्षात विविध सुविधेचा अभाव असल्याच्या तक्रारीचा पाढ़ा काही रुग्णानी बोलून दाखवला.या सर्व ऊनीवेची दखल घेण्याच्या सूचना सविस्तर मांडल्या.सनोग्राफी मशीनची उनिव लवकर दूर झाली पाहिजे अशी सुद्धा मागणी त्यांनी केली व येथील पेशंटला परभणीला रेफर करण्याचे प्रमाण कमी असले पाहिजे याच ठिकाणी जास्तीत जास्त ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांना आवश्यक औषधोपचार व  सुविधा कसे केले जातील याकडे लक्ष देण्याची मागणी केली.पीएम रूम, रुग्णालयाची रंगरंगोटी, पूर्ण रुग्णालय परिसरात स्वच्छता ठेवन्याच्या सूचना  दिल्या.या पुढे दर महिन्यास जिंतुर-सेलू या ठिकाणी आवर्जून बैठक घेवून सर्व रुग्णालयाचा आढावा घेतला जाईल असे स्पष्ट केले.या वेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधीक्षक रविकिरण डॉ.चांडगे, डॉ.म्हस्के,डॉ.खान व डॉ.विनोद राठोड यांची उपस्थिती होती....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या