💥कोविड संक्रामण काळात मनपा ने खरेदी केलेल्या निकृष्ट दर्जाच्या साहित्य खरेदीच्या चौकशीचे जिल्हाधिकारी यांचे आदेश...!


💥प्रहार जनशक्ती पक्षाने केली होती पुराव्यासह तक्रार💥


परभणी (दि.०३ जानेवारी) - कोविड -१९ च्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये परभणी शहरातील कोविड संक्रमित नागरीकांच्या विलगीकरण कक्ष व तात्पुरत्या उपचाराची सोय व्हावी यासाठी परभणी शहर महानगर पालिकेने शहरामध्ये विविध ठिकाणी केंद्र स्थापन केली होती व त्यासाठी बेड, खाटा व इतर साहित्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी मनपाने केली होती. ही खरेदी निकृष्ट दर्जाची असल्याकारणाने खरेदी करण्यात आलेले ते बेड, खाटा व इतर साहित्य वर्ष भरातच भंगार झाले व त्यातील बरेच साहित्य वापरण्या योग्य पण राहिले नाही. कोविड काळात राज्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला असल्यामुळे महानगरपालिकेने त्यावेळी खरेदी केलेल्या निकृष्ट दर्जाच्या साहित्याचे ऑडिट होणार नाही हे माहीत असल्याने याचाच गैरफायदा घेत महानगरपालिकेने निकृष्ट दर्जाचे साहित्य अव्वाच्या सव्वा किंमतीने खरेदी केले ते सर्व साहित्य सध्या शहरातील नटराज रंग मंदीर येथे धुळखात पडून आहेत. देशासह राज्यात कोविड ची रुग्ण संख्या वाढत असून उद्या शहरात जर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर मनपा ने खरेदी केलेले साहित्य पुनर्वापर करता येणार नाही व परिस्थिती हाताबाहेर जाईल.


कोविड संक्रमण काळात मनपा ने खरेदी केलेल्या निकृष्ट दर्जाच्या साहित्याची तात्काळ चौकशी करुन दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कार्यवाही करावी या बाबत प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह दि. ०१ डिसेंबर २०२१ रोजी श्रीमती आँचल गोयल , जिल्हाधिकारी परभणी यांची भेट घेऊन चौकशीच्या मागणीचे निवेदन देण्यात आले होते निवेदनासोबत परभणी शहर महानगरपालिकेने खरेदी केलेल्या निकृष्ट दर्जाच्या साहित्याचे छायाचित्रे पुरावा म्हणून जिल्हाधिकारी मॅडम यांना देण्यात आलेले होते. या तक्रारीची गंभीर दखल घेऊन मा. जिल्हाधिकारी मॅडम परभणी यांच्या आदेशाने महेश वडदकर निवासी उपजिल्हाधिकारी परभणी यांनी दि.२८.१२.२०२१ रोजी आयुक्त परभणी शहर महानगरपालिका परभणी यांना पत्र देऊन प्रहार जनशक्ती परभणी यांनी केलेल्या तक्रारीतील मुद्यांच्या आधारे कोविड संक्रमण काळामध्ये मनपाने खरेदी केलेल्या निकृष्ट दर्जाच्या साहित्य खरेदीची तत्काळ सखोल चौकशी करून चौकशी अहवाल मा. जिल्हाधिकारी परभणी यांना सादर करण्याचे कळविले आहे. या चौकशीने कोविड काळामध्ये मनपाने खरेदी केलेल्या निकृष्ट दर्जाच्या खरेदीचे रॅकेट उघड होण्याची दाट शक्यता आहे.


निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, तालुका प्रमुख बालासाहेब तरवटे, दिव्यांग आघाडी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर पंढरकर, वाहतूक आघाडी तालुका प्रमुख रामेश्वर जाधव, मीडिया प्रभारी नकुल होगे, सर्कल प्रमुख श्याम भोंग, वैभव संघई आदींच्या स्वाक्षऱ्या होत्या....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या