💥पुर्णेतील रेल्वे उड्डाणपुलाच्या दर्जाहीन कामावर प्रशासन अंकुश लावण्याच्या तयारीत ?


💥रेल्वे उड्डाण पुलाच्या निकृष्ट कामाच्या चौकशीसाठी क्वालिटी कंट्रोलचे पथक पूर्णेत दाखल💥


पूर्णा (दि.०७ जानेवारी) - पुर्णा-चुडावा-नांदेड मार्गावरील हिंगोली रेल्वे गेट परिसरात जवळपास शंभर कोटी (९८ कोटी ६६ लाख ३५ हजार ७०० रुपयें) रुपयांच्या निधीतून बांधण्यात येत असलेल्या उड्डाण पुलाचे बांधकाम बांधकामाचे गुत्ते घेतलेल्या एम/एस डिसीएस - पि.व्ही.राव यांच्याकडून अत्यंत निकृष्ट दर्जाचे अर्थात दर्जाहीन होत असल्या संदर्भात तालुक्यातील वर्तमान पत्रांसह वेब वृत्त वाहीण्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून त्याची रेल्वे प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन कामाचा दर्जा तपासण्यासाठी मुंबईचे क्वालिटी कंट्रोल मॅनेजर एस आर सुनिल यांच्या नेतृत्वाखालील एक पथक पाठवले सदरील पथकाने दिवसभर ह्या कामावर देखरेख आणि कामा संदर्भात चौकशी केली.


दरम्यान सदरील रेल्वे उड्डाण पुलाच्या कामात पथकाला बऱ्याचशा त्रुटी दिसून आल्या आणि त्यासाठी त्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश संबंधित कंत्राटदारास देऊन त्रुटी तात्काळ दूर करणार असल्याचे प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले तसेच ह्या कामावरील दोन अभियंत्यांची तातडीने बदली केली असून त्याजागी दुसरे तज्ज्ञ अभियंत्यांची नियुक्ती केल्याचे सांगितले यानंतरही काही उणिवा आढळल्यास तुम्ही माझ्याशी संपर्क साधा असे सांगितले यावरून आतातरी उड्डाणपुलाचे काम निश्चित मानकाप्रमाणे होईल अशी आशा पुर्णेकराना वाटतेय...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या