💥क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या सामाजिक व शैक्षणिक कार्यास जगाच्या इतिहासात तोड नाही.....!


💥यावेळी अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत हिवाळे हे होते💥

पूर्णा ; येथील बुद्ध विहार समिती भारतीय बौद्ध महासभा व महिला मंडळाच्या वतीने शांतीनगर पूर्णा या ठिकाणी सायंकाळी सहा वाजता भंते पया वंश भन्ते संघरत्न यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत हिवाळे प्रमुख वक्त्या व सत्कार मूर्ती म्हणून प्राध्यापक डॉक्टर लेनिना एस. व्हीं. बी. सत्यशोधक समाज नांदेड जिल्ह्याचे अध्यक्ष भगवान चंद्रे, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या राज्य सदस्य श्रीमती गाहिन वाड,सुप्रसिद्ध गायक संगीतकार पुंडलिक इंगळे यांचीउपस्थिती होती आपल्या प्रमुख मार्गदर्शना मध्ये प्राध्यापक डॉ. लेनिना एस. व्हि.बी.यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची महती विशद करताना सांगितले सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी समाजपरिवर्तनासाठी केलेलं कार्य निश्चितपणे खूप मोठ आहे. जगाच्या इतिहासात या कार्याला तोड नाही.

स्त्रियांनी अंधश्रद्धा कर्मकांड बुवाबाजी यापासून दूर राहून आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनल पाहिजे.महामानव तथागत भगवान बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज क्रांतिसूर्य महात्मा फुले सावित्रीबाई फुलेव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आचरणात आणून  निकोप समाजनिर्मितीसाठी प्रयत्न केले पाहिजे सत्यशोधक समाज नांदेड जिल्ह्याचे अध्यक्ष भगवान केंद्रे यांनी ज्योतिबा फुले सावित्रीबाई यांनी स्थापन केले सत्यशोधक समाजाविषयी माहिती दिली सत्यशोधक समाज ज्यामधून फुले दाम्पत्यांना निकोप आदर्श समाज निर्माण करायचा होता असे प्रतिपादन केले.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सदस्य श्रीमती गहिन वाड यांनी स्त्रियांमधील अंधश्रद्धा देवभोळेपणा यावर प्रकाश टाकला सुप्रसिद्ध कवी व संगीतकार पुंडलिक इंगळे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर प्रेरणादायी गीत सादर केले भंते पय्या वंश यांनी आपल्या मार्गदर्शना मध्ये महापुरूष समाजसुधारकांचे विचार देशाला प्रगतीच्या दिशेने येऊ शकतात सावित्रीबाई फुलेंचा आदर्श महिलांनी घेतला पाहिजे भन्ते संघरत्न यांनी सावित्रीबाई फुले जयंती महोत्सव आयोजना पाठीमागचे भूमिका विशद केली या व्याख्यानाच्या माध्यमातून स्त्रियांना निश्‍चितपणे प्रेरणा मिळू शकते असे ते म्हणाले.

अध्यक्षीय समारोप मध्ये भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत हिवाळे यांनी स्त्रियांनी उच्च शिक्षण घेऊन क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला समाज निर्मितीसाठी आपले योगदान दिले पाहिजे असे आव्हान त्यांनी केले प्रमुख वक्ते व सत्कार मूर्ती यांचा शाल पुष्पहार व सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा देऊन महिला मंडळाच्या वतीनेसत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय बौद्ध महासभेचे शहराध्यक्ष बौद्धाचार्य त्रंबक कांबळे यांनी तर सूत्रसंचालन प्राध्यापक नितीन नरवाडे आभार भारतीय बौद्ध महासभेचे तालुका सचिव अतुल गवळी यांनी मानले.

कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुकाध्यक्ष श्यामराव जोगदंड, उपाध्यक्ष गौतम वाघमारे कोषाध्यक्ष किशोर ढाकरगे बौद्धाचार्य उमेश बराटे सामाजिक कार्यकर्ते साहेबराव सोनवणे,शिवाजी थोरात, अमृत मोरे,टी झेड कांबळे आदींची उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय खंडागळे सुरज जोंधळे सोनू काळे प्रकाश जगताप व महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या