💥वाशिम येथे निराधार,गरजुंना किराणा किटचे वितरण.....!

 


💥महिला राजसत्ता आंदोलन गृपचा अप्रतिम उपक्रम💥 

✍️फुलचंद भगत

वाशिम:-महिला राजसत्ता आंदोलन गृपकडुन नेहमी समाजपयोगी ऊपक्रम राबवन्यात येत असतात.महिला राजसत्ताक आंदोलनाच्या संघटिका अनिताताई वाघमारे यांच्या प्रमुख नेतृत्वात आणी सरपंचा धोटे यांच्या ऊपस्थितित वाशिम जिल्ह्यातील अनेक ठिकाणी गरजुंंना राशन किट वाटप करुन गरजुंना मदतीचा हात दिला आहे.

                मंगरुळपीर येथुन जवळच पं. सं पिंपळखुटा गणातील धोत्रा ग्रामपंचायत भवनात १२/१/२१/२२ रोज बुधवारला कोविड १९चे पालन करुन जिजाऊ जयंती सप्ताह उत्सवा निमित्त ग्रामदृष्टी प्रकल्पा अंतर्गत असलेल्या गावातील आर्थिक दुर्बल आणि कोराना काळात निराधार झालेल्या अत्यंत गरीब कटुंबातील  व्यक्तिंना उपजीविकेचा आधार देण्यात यावा म्हणून आपल्या जिल्ह्याच्या राष्ट्रपती पुरष्कार प्राप्त महीला राजसत्ता आंदोलन च्या जिल्हा संघटिका सौ. अनिताई वाघमारे यांनी आपल्या जिल्ह्याच्या संपूर्ण तालुक्यातील निराधारांना आधार मिळावा म्हणून कोरो फेलासिप या संस्थेकडे पाठपुरावा करून आणलेल्या राशन किट वाटप कार्यक्रम अध्यक्ष निता राऊत सरपंच प्रतिनिधी धोत्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत निवड पात्र लाभार्थी महिलांना लाभ देण्यात आला.यावेळी महिला शिवसेना तालुका प्रमुख सौ.सोनलताई राजेश गावंडे पोटी, सौ साधनाताई सोनोने पोघात,सौ वर्षाताई प्रदिप पडघान पिंपळखुटा ईत्यादि पंचायत सखी आणि सामाजिक कार्यकर्ते,धोत्रा सरपंच,श्री प्रकाश गावंडे सरपंच पोटी, श्री गजानन डोंरदिवे पो.पाटील पोटी, ग्रामपंचायत धोत्रा उपसरपंच पाटील व सर्व सदस्य गण आणि किरणदादा वाघमारे, ईत्यांदिच्या उपस्थितीत गरजूंना किराणा किटचे वाटप करण्यात आले.या अप्रतिम उपक्रमापासुन प्रेरणा घेऊन आम्ही हा कार्यक्रम अविरत चालू ठेवण्यासाठी हमेशा सावित्री संग ज्योतिबा म्हणून सावली बनुन राहु परंतु समाजातील मनाने मोठे असणार्‍या दानशूर लोकांनी कोराना काळात बेआधार झालेल्या आर्थिक दुर्बल घटकातील दलित, वंचीत व गरजुंना मदतीचा हात देण्यासाठी सोबत सदैव राहु असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त करत या सामाजिक कार्यात सेवाभावींनी येण्याचे आवाहनही केले.

प्रतिनिधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या