💥भीमा कोरेगाव चा रणसंग्राम सामाजिक न्यायासाठी होता.....!


 💥संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संदीप माटेगावकर यांचे प्रतिपादन💥

पूर्णा (दि.०२ जानेवारी) बुद्ध विहार समिती भारतीय बौद्ध महासभा पूर्णा व महिला मंडळाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी सकाळी दहा वाजता अभिवादन सभेचे आयोजन केले होते. डॉ. उपगुप्त महाथेरो भंते पायवांश भन्ते संघरत्न यांच्या मार्गदर्शनाखाली व सुप्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत प्रकाश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अभिवादन सभेला प्रमुख वक्ते म्हणून संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संदीप माटेगावकर हे होते.


याप्रसंगी प्रमुख उपस्थिती माजी उपनगराध्यक्ष नगरपालिकेचे गटनेते उत्तम भैय्या खंदारेज्येष्ठ नगरसेवक अनिल खर्ग खराटे नगरसेवक एडवोकेट हर्षवर्धन गायकवाड एडवोकेट धम्मा जोंधळे, सामाजिक कार्यकर्ते दादाराव पंडित पोलीस निरीक्षक सुभाष मारकड प्राचार्य डॉ. केशव जोंधळे, पत्रकार विजय बगाटे मुकुंद पाटीलभारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुकाध्यक्ष शामराव जोगदंड दिलीप हनमंते आदींची उपस्थिती होती.

अभिवादन सभे अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहारघालण्यातआला भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत हिवाळे यांच्या हस्ते निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले भीमा कोरेगाव विजय स्तंभा च्या प्रतिकृतीला पुष्पचक्र व पुष्पहार अर्पण करून समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली.

अभिवादन सभेला संबोधित करताना संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संदीप माटेगावकर यांनी भीमा कोरेगाव या ठिकाणी 1 जानेवारी 1818 झालेल्या महार रेजिमेंट व पेशव्यांच्या विरोधात झालेल्या रन संग्रामाचे रोमहर्षक वर्णन केले. भीमा कोरेगावचा रणसंग्राम सामाजिक न्यायासाठी होता मनुवादी व्यवस्था उखाड न्या साठी केलेला तो पराक्रम होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश कांबळे यांनी महार रेजिमेंटचे कॅप्टन सिद्ध नाक व त्यांच्या पाचशे सैनिकांची शौर्यगाथा विशद केली. पेशव्यांचे राज्य म्हणजे शूद्रातिशूद्रांना अतिशय हीन वागणूक देणार निसर्गाने दिलेले हक्क हिरावून घेणार जुलमी राज्य होतं.

भंते पया वंश यांनी आपल्या धम्मदेशना मध्ये महामानव तथागत भगवान बुद्धांचे व बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे यांचे मानवतावादी विचार आचरणात आणून भीमा कोरेगाव येथे सामाजिक न्यायासाठी लढलेल्या शूर सैनिकाचे सदैव स्मरण ठेवून अन्यायाच्या विरोधात उभे राहण्याचे आव्हान केले.

या कार्यक्रमामध्ये महात्मा समता कबीर परिषदेचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल कवी व बौद्धाचार्य उमेश बऱ्हाटे व भीमा कोरेगाव शौर्य स्तंभाची भव्य प्रतिकृती उभारण्यात योगदान दिल्याबद्दल शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्रीकांत हिवाळे यानी केले .

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बौद्धाचार्य त्रंबक कांबळे टी झेड कांबळे अमृत मोरे भोजराज कसबे पीएम बागुल शिवाजी थोरात बाबाराव वाघमारे मुंजाजी गायकवाड अतुल गवळी दिलीप गायकवाड मोहन लोखंडे शिवाजी वेडे विजय खंडागळे सुरज जोंधळे प्रकाश जगताप व महिला मंडळांनी परिश्रम घेतले..,..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या