💥परभणी येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन संभाजी सेनेच्या वतीने उत्साहात साजरा....!


💥त्यावेळी संभाजी सेनेचे प्रदेशाध्यक्ष रामेश्वर शिंदे,सहाय्यक पोलीस निरीक्षक बी.एच.हराळे यांची प्रमुख उपस्थिती💥 

परभणी (दि.१६ जानेवारी) - छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन संभाजी सेनेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला १६ जानेवारी १६८१ रोजी छत्रपती संभाजी महाराजांनी रायगडावर स्वतःला राज्याभिषेक करुन घेतला होता तो दिवस महाराष्ट्रातील जनतेसाठी अतिशय स्वाभिमानाचा दिवस असल्याने छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन संभाजी सेनेच्या वतीने उत्साहाने साजरा करण्यात आला.

 त्यावेळी संभाजी सेनेचे प्रदेशाध्यक्ष रामेश्वर शिंदे,जिल्हाध्यक्ष विठ्ठल तळेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक बी एच हराळे, शहराध्यक्ष अरुण पवार, मराठवाडा उपाध्यक्ष ओम लड्डा, कार्याध्यक्ष गजानन लव्हाळे, जिल्हा संघटक विजय जाधव, जिल्हा संपर्कप्रमुख नारायण देशमुख, तालुका अध्यक्ष दौलत शिंदे,कुणाल गायकवाड, पवन कुरील, रामा शिंदे,माधव थिटे,प्रमोद जोगदंड ,अभी कदम ,गोविंद तळेकर, पवन शिंदे,पिराजी धबडगे,दत्ता काकडे ,संदीप मोरे हनुमान मोहटे रामभाऊ सबनवार ,आकाश शिंदे आदींसह संभाजी सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या