💥पुर्णेतील विद्या प्रसारणी सभेच्या शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक डॉ.हरिभाऊ पाटील यांचा पुस्तक देऊन सत्कार....!


💥माजी प्राचार्य डॉ.सी.एम.बुरटे व सेवानिवृत तत्त्वज्ञान विभाग प्रमुख प्रा.ई.आर.मठवाले यांनी केला सत्कार💥

पूर्णा (दि.०२ जानेवारी) - शहरातील नामांकित अशा विद्या प्रसारिणी सभेच्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक डॉ. हरिभाऊ पाटील हे पूर्णा शहरातील एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे ! उत्तम प्रशासक, निर्भीड पत्रकार, उत्तम वक्ता, पुस्तकप्रेमी, शिक्षण प्रेमी, सर्वधर्मसमभाव वृत्ती, तसेच रेल्वे चे प्रश्न, शिक्षणाच्या क्षेत्रातील प्रश्न, समाजातील विविध समस्यांची जाण असणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ते सर्व परिचित आहेत.

डॉ. हरिभाऊ पाटील हे दिनांक ३१/१२/२०२१ रोजी सेवानिवृत्त झाले. याप्रसंगी श्री गुरू बुद्धीस्वामी महाविद्यालया चे माजी प्राचार्य डॉ. सी. एम. बुरटे व याच महाविद्यालयाचे सेवानिवृत्त तत्त्वज्ञान विभाग प्रमुख प्रा.ई.आर.मठवाले यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन शाल, श्रीफळ, पुष्पहार व डॉ. ना.य. डोळे यांचे आत्मचरित्र "प्राचार्य" आणि "सुविचार संग्रह" ही दोन पुस्तके देऊन त्यांचा यथायोग्य  सत्कार केला. त्याप्रसंगाचे हे छायाचित्र.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या