💥 महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार काळाच्या कसोटीला उतरलेले आहेत....!


💥डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांचे प्रतिपादन💥

पूर्णा (दि.14 जानेवारी) - डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त तथागत मित्रमंडळाने डॉक्टर आंबेडकर चौक पूर्णा या ठिकाणी डॉक्टर उपगुप्त महाथेरो,भंते पैयावांश, यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली रिपाइं नेते यादवराव भवरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात सुप्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत प्रकाश कांबळे पोलीस निरीक्षक सुभाष मारकड नगरसेवक अनिल खर्ग खराटे मधुकर गायकवाड, एडवोकेट धम्मदीप जोंधळे, एडवोकेट हर्षवर्धन गायकवाड, दादाराव पंडित, वीरेश कसबे अशोक धबाले, मुकुंद भोळे, भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष शामराव जोगदंड,पत्रकार विजय बगाटे  अमृतराव मोरे, मुकुंद पाटील दिलीप गायकवाड पी.जी. रणवीरआदींची उपस्थिती होती.


सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. ज्येष्ठ धम्म उपासक अमृत मोरे राजभोज गुरुजी, बळीराम खारे हनवते गुरुजी यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी डॉ. उपगुप्त महाथेरो यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठस्थापना दिनानिमित्य  बोलताना सांगितले नामांतर आंदोलनाचा इतिहास रोमहर्षक आहे. मनुवादी मानसिकतेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला विरोध करण्यात आला होता.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दूरदृष्टीचे महापुरुष होते. त्यांचं शिक्षण क्षेत्रातील योगदान सर्वश्रुत आहे. मराठवाड्यामध्ये औरंगाबाद या ठिकाणी मिलिंद कॉलेज स्थापण्यासाठी दोनशे एकर जागा खरेदी केले होती. त्यावेळी बरेच जाणते लोक म्हणत होते या ठिकाणी कॉलेज चालेल का.? त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले फक्त कॉलेजच नाही तरी या ठिकाणी विद्यापीठाची आवश्यकता आहे असे त्यांनी इलेक्शन सांगितले होते.

यावरून त्यांचे विचार काळाच्या कसोटीला उतरणारे होते असे सिद्ध होते सुप्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत व पॅंथर चळवळीतील लढवय्ये प्रकाश कांबळे यांनी पूर्णा शहराचा व मराठवाड्याचा नामांतर चळवळीचा इतिहास विशद केला नामांतराचा लढा हा आंबेडकरी समाजाच्या अस्मितेचा लढा होता असे ते म्हणाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक तथागत मित्र मंडळाचे संस्थापक सदस्य व माजी अध्यक्ष नगरसेवक एडवोकेट धम्मदीप जोंधळे यांनी केले.

तथागत मित्र मंडळाचे अध्यक्ष नगरपालिकेचे गटनेते व कार्यक्रमाचे संयोजक उत्तम भैय्या खंदारे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन कार्यक्रम आयोजना पाठीमागचे भूमिका विशद केलीगेल्या दोन दशकापासून सातत्यपूर्ण नामविस्तार दिनाचे आयोजन करून नामांतराचा इतिहास  समाजासमोर मांडणी अतिशय महत्त्वाचे आहे. नामविस्तार दिनानिमित्त विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्यामधून कलागुणांना वाव मिळावा व रचनात्मक कार्यामध्ये रुची निर्माण व्हावी प्रशस्तीपत्र देऊन सर्वांचा सन्मान करण्यात आला सूत्रसंचालन श्रीकांत हिवाळे यांनी तर पूजा विधी बौद्धाचार्य त्रंबक कांबळे अतुल गवळी उमेश बराटे यांनी पार पाडला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तथागत मित्र मंडळाचे प्रवीण कनकुटे सुबोध खंदारे, विशाल भुजबळ, व मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या