💥औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर पोलिस स्थानकाच्या हद्दीतील शिवराई फाट्याजवळ भिषण अपघात...!


💥दोन आयशर ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने या अपघातात ४ जनांचा जागेवरच मृत्यू तर २२ जन गंभीर जखमी💥

संभाजी नगर/औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर पोलिस स्थानकाच्या हद्दीतील शिवराई फाट्याजवळ आज सोमवार दि.३१ जानेवारी रोजी मध्यरात्री ०३-०० वाजेच्या सुमारास अत्यंत भिषण असा अपघात झाला असून दोन आयशर ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने या  अपघातात चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयविदारक घटना घडली आहे.

समोरासमोर धडक झालेल्या आयशर ट्रकातील एका ट्रकमध्ये लग्नाचं वऱ्हाड होते या अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर २२ जण गंभीर जखमी आहेत. अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंवले आहे. यातील काही जखमींना औरंगाबाद येथील रुग्णालयात तर काही जखमींना नाशिकला हलवल्याची माहिती मिळाली आहे. मध्यरात्री ०३-०० वाजेच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे.

औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील औरंगाबाद लासूर रोडवरील हा भीषण अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या वाहनातून वऱ्हाडी औरंगाबाद वरून नाशिककडे लग्न समारंभासाठी निघाले होते. पहाटे तीन वाजेच्या सुमारास दोन्ही आयशरमध्ये हा अपघात झाला आहे. अपघातात २२ जण जखमी तर ४ जण जागीच मृत्यूमुखी झाल्याची माहिती वैजापूर पोलिसांनी दिली आहे.जखमींपैकी ४ जणांवर औरंगाबादमध्ये उपचार सुरू आहेत तर बाकी जखमींना नाशिक येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या