💥परभणी शहराला वाढत्या गुन्हेगारीने दिली नववर्षाची रक्तरंजीत सलामी ; १७ वर्षीय युवकाची निर्घण हत्या..!


💥पारवा रोडवरील केनॉल जवळ १७ वर्षीय युवकाची डोक्यावर घाव घालून निर्घृण हत्या💥

परभणी (दि.०१ जानेवारी) - जिल्ह्याला जयंत मिना यांच्या रुपाने अत्यंत कर्तव्यकठोर व कर्तव्यदक्ष पोलिस अधिक्षक लाभल्यानंतर ही गुन्हेगारी प्रवृत्ती कधीमधी डोके वर काढतांना दिसतच असून आज ०१ जानेवारी २०२२ रोजी नवर्षाच्या दिवशीच शहरातील पारवा रोडवरील केनॉल जवळ १७ वर्षीय युवकाची डोक्यावर घाव घालून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली असून या घटनेतून असे निदर्शनास येते की वाढत्या गुन्हेगारीने नववर्षाला रक्तरंजीत सलामी देऊन कायदा व सुव्यवस्थेला पुन्हा एकदा आव्हान दिले आहे.


या घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासनाने घटनास्थळावर तात्काळ धाव घेतली असून या प्रकरणी पोलिस प्रशासनाने चार संशयीतांना ताब्यात घेतल्याचे समजते या संदर्भात अधिक माहिती अशी की परभणी शहरातील पारवा रोडवरील केनॉलच्या लगत एका १७ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या झाल्याची माहिती पोलिसांना कळाल्यावर पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहचले व घटनास्थळ पंचणामा करून तपासाची चक्र फिरवत श्वान पथकाला पाचारण केले व चार संशयीतांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली हत्येचे मुळ कारण अद्यापही समजले नसून हत्या झालेल्या १७ वर्षीय युवकाचे नाव अमीष खान पिता नवीद खान राहणार भोई गल्ली असे असून सदरील युवक कालपासून घरातून गायब होता.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या