💥आयुष्यात कितीही वाईट प्रसंग आला तरीही हार पत्करायची नाही....!


💥याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी कापसीकर म्हणाले की आयुष्यात कितीही वाईट प्रसंग आला तरीही हार पत्करायची नाही💥



पुर्णा (दि.०४ जानेवारी) - येथील गट साधन केंद्रात आज मंगळवार दि.०४ जानेवारी २०२२ रोजी अंधाचे प्रकाशदूत तथा ब्रेल लिपीचे जनक लुई ब्रेल यांची जयंती साजरी करण्यात आली.

याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी श्री.कापसीकर म्हणाले की आयुष्यात कितीही वाईट प्रसंग आला तरीही हार पत्करायची नाही.येणाऱ्या प्रसंगाला धैर्याने सामोरे जायचे. सतत प्रयत्न करायचे उल्हासनगर, मुबई येथील प्रांजल पाटील या अंध तरुणीने सर्व प्रकारच्या मर्यादावर मात करत वयाच्या 30 व्या वर्षी देशातील पहिली अंध आयएएस अधिकारी होण्याचा मान पटकावला हि सर्वांसाठीच फार अभिमानाची व प्रेरणादायी गोष्ट आहे याचे संपूर्ण श्रेय आदरणीय लुई ब्रेल यांनाच जाते कार्यक्रमासाठी जाधव एन.जी,सोनुले विलास,भरणे एस. बी,जाधव व्हि.टी,सुर्यवंशी बालाजी,थडवे सर, श्री. डावरे, चंद्रन नरमला, महाजन व नबिल उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या