💥या मेळाव्यास संस्थेचे प्राचार्य यांनी मार्गदर्शन केले💥
परळी, (प्रतिनिधी):- शासकीय औधोगिक प्रशिक्षण संस्था परळी व धुत कंपनी लिमिटेड औरंगाबाद यांच्या माध्यमातून तालुक्यातील प्रशिक्षित युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी दि. २९ डिसेंबर २०२१ रोजी भव्य रोजगार मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यास संस्थेचे प्राचार्य यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी दोनशे पेक्षा अधिक प्रशिक्षणार्थी युवक-युवती उपस्थित होते. त्या पैकी २८ मुले व २५ मुली असे एकूण ५३ जणांची धूत कंपनी लिमिटेड औरंगाबाद करीत निवड झाली. असून त्यांना तात्काळ कंपनीने नियुक्ती पत्र दिले आहे.निवड झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांची सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. परळी सारख्या ग्रामीण भागात शासकीय औधोगिक प्रशिक्षण संस्था परळी व धुत कंपनी लिमिटेड औरंगाबाद यांनी युवकांना नौकरीची संधी उपलब्ध करून देऊन इतरही युवकांना प्रशिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे प्राचार्य, शिक्षक व कंपनी कर्मचाऱ्यांनी योगदान दिले.....
0 टिप्पण्या