💥ऊस तोडी साठी शेतकऱ्यांकडून पैसे घ्याल तर खबरदार ; योगेश्वरी शुगर्सचा इशारा...!


💥योगेश्वरी शुगर्स चे कार्यकारी संचालक ॲड.रोहित आर देशमुख यांनी एका परिपत्रकाव्दारे जाहिर केले💥

✍️किरण घुंबरे पाटील

पाथरी:-सद्य स्थितीत ऊसाचा तोडणी हंगाम जोरकस पणे सुरू आहे.पाण्याची मुबलक उपलब्धता असल्याने इतर पिकांच्या तुलनेत ऊसाच्या पिकातून चार पैसे शेतकऱ्यांच्या पदरी हमीने पडत असतात शिवाय किडरोगाला ऊसाचे पिक बळी पडत नसल्याने शेतकरी या पिकाकडे मोठ्या प्रमाणात वळला आहे.मात्र आता एैन हंगामात कारखाण्याने शेतकऱ्यांच्या ऊसाला तोड दिल्या नंतर ही तोडणी कामगार,मुकादम,वाहन चालक शेतक-यांची अडवणूक करत पैशांची मागणी करत असल्याच्या तक्रारी सर्वत्र एैकावयास मिळत असल्याने या गंभिर विषयाची योगेश्वरी शुगर्स ने गंभिर दखल घेतली असून ऊस तोड कामगार, मुकादम,वाहनचालक यांनी ऊसतोड,वाहतुकी साठी जर शेतक-यां कडे पैशाची मागणी केली आणि या विषयी तक्रार आल्यास तोडणी,वाहतूक बिलातून रक्कम कपात करून शेतक-यांना देण्यात येणार अल्याचे योगेश्वरी शुगर्स चे कार्यकारी संचालक ॲड.रोहित आर देशमुख यांनी एका परिपत्रका व्दारे २७ डिसेंबर रोजी जाहिर केले आहे.

या विषयी काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की,ऊसाची तोड/वाहतुक करण्या साठी ऊस तोडणी लेबर, मुकादम व वाहन चालक यांचे कडून ऊस उत्पादक शेतकरी यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. ऊस पिक चांगले नाही, ऊस खराब आहे. रस्ता नाही अशी वेगवेगळी कारणे सांगून शेतकऱ्यां कडून पैसाची मागणी केली जात आहे. या संदर्भात साखर आयुक्त पुणे यांनी दि. ११ ऑक्टोबर २०२१ रोजी परिपत्रक काढलेले आहे. त्या अनुषंगाने ऊस तोडणी ठेकेदार, मुकादम, लेबर किंवा वाहन चालक यांनी शेतकऱ्यां कडून अनधिकृतपणे पैसे घेवू नये. त्यासाठी कारखान्याकडून तोडणी/वाहतुक कामा साठी हंगाम सुरु होण्या पुर्वी सहा महिने अगोदर ठेकेदारांना अॅडव्हान्स दिलेला आहे. ऊस उत्पादकांचा ऊस तोडणी करून कारखान्या पर्यंत वाहतुक करण्या साठी प्रती टन खर्च कारखाना करत असतो त्यामुळे अशा प्रकारे पैसाची मागणी करीत असल्याची तक्रार आल्यास व तकारी मध्ये तथ्य असल्यास सदरची रक्कम तोडणी/वाहतुक ठेकेदाराचे बिलातून कपात करून सबंधीत ऊस उत्पादकास अदा करण्यात येईल असा इशारा योगेश्वरी शुगर्स लक्ष्मीनगर लिंबाच्या वतीने कार्यकारी संचालक ॲड.रोहित आर देशमुख यांनी लेखी परीपत्रका व्दारे दिला आहे.

💥पैसे घेणाराची गय करणार नाही - चेअरमन देशमुख.

शेतकरी हाडाची काडं करून दिवस रात्र काबाडकष्ट करून घाम गाळत असतो. त्याच्या कष्टाचं चिज झालं पाहिजे शेतक-यांना कुणीही त्रास देता कामा नये.पैशा साठी तर त्रास नकोच जो कोणी पैशाची मागणी करेल त्याची तक्रार आल्यास कोणाची ही गय करणार नाही तसेच शेतक-यांनी ही ऊसा साठी थोडा संयम धरावा नियमा प्रमाणे ऊसाची तोड सुरू असून ब्रिक्स आलेला प्रत्येक शेतक-यांचा ऊस गाळपा साठी आणल्या जात आहे.शेतक-यांनी ही तोडणी कामगार आणि वाहतुकदार यांना आमिश न देण्याचं आवाहन कारखाना कार्यालयात तेजन्यूजशी बोलतांना योगेश्वरी शुगर्स चे चेअरमन तथा माजलगावचे माजी आ आर टी देशमुख जिजा यांनी केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या