💥पुर्णा तालुक्यातील फुलकळस शिवारात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या...!


💥स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडास दोरीने गळफास घेऊन अभिषेक माधव सराटे याने आपली जिवनयात्रा संपवली💥

पूर्णा ; तालुक्यातील फुलकळस येथे दि.१३ डिसेंबर २०२१ रोजी रात्री ०७-०० वाजेच्या दरम्यान स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडास दोरीने गळफास घेऊन अभिषेक माधव सराटे वय वर्ष २१ रहाणार फुलकळस या युवकाने अज्ञात कारणावरून गळफास घेऊन जीवनयात्रा संम्पवली.

               सविस्तर माहिती अशी की १३ डिसेंबर २०२१ रोजी रात्री घरी न आल्याने घरच्यांनी शोधा शोध केली असता, ज्ञानोबा संभाजी सरकाटे वय ५२ वर्ष यांना सदरील युवक गळफास घेतल्याचे निदर्शनास आले असता, त्यांनी ताडकळस पोलीस ठाण्यास माहितीसत्व कळवले. ताडकळस पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर घटनेचा पंचनामा करून सदर युवकाचे प्रेत प्राथमिक आरोग्य केंद्र ताडकळस येथे शवविच्छेदना साठी आणले. रात्री उशिरा आरोग्य केंद्रातील डॉ.कल्पना आळणे यांनी शवविच्छेदन केले असता रात्री उशिरा त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आला.

                     ज्ञानोबा संभाजी सराटे यांच्या फिर्यादी वरून ताडकळस पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू ची नोंद करण्यात आली. पुढील तपास ताडकळस पोलीस ठाण्याचे ठाणेदार विजय रामोड यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार प्रभाकर राठोड, रामकीशन काळे हे पुढील तपास करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या