💥भारताला ऊर्जाक्षेत्रात आत्मनिर्भर बनण्यासाठी अपारंपारीक ऊर्जा निर्मिती व ऊर्जा संवर्धनाची गरज - मुख्य अभियंता मोहन आव्हाड


💥औष्णिक विद्युत केंद्र तर्फे आयोजित ऊर्जा संवर्धन सप्ताहाचे समारोप प्रसंगी ते बोलत होते💥

परळी (प्रतिनिधी) - भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात विविध कार्यक्रमांचे आयोजन सर्व स्तरातून होत असून त्या अंतर्गत औष्णिक विद्युत केंद्र तर्फे आयोजित ऊर्जा संवर्धन सप्ताहाचे समारोप दि २४ रोजी मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांच्या अध्येक्षतेत संपन्न झाला.या कार्यक्रमाला महाऊर्जा विभागाचे  महाव्यवस्थापक,(लातूर - बीड ) देवीदास  कुलकर्णी ,यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

या कार्यक्रमामध्ये ऊर्जामंचावर  उपमुख्य अभियंता एस पी राठोड , उपमुख्य अभियंता एच के अवचार , अधीक्षक अभियंता डी जी इंगळे , अधीक्षक अभियंता सी आर होळंबे ,कार्यकारी अभियंता(EST),मुख्य कार्यालय संदीप गुंजाळ इ उपस्थित होते तसेच महा ऊर्जा प्रकल्प अधिकारी शुभम पिसाळ यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीस विविध शाळेतील मुलांनी काढलेल्या ऊर्जा संवर्धन संकल्पनेतील पोस्टर्स ची प्रदर्शनी मान्यवरांनी पाहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

सर्व मान्यवरांचे स्वागत झाल्यानंतर ऊर्जा संवर्धनाची शपथ घेण्यात आली मान्यवरांच्या भाषणात ऊर्जा संवर्धनाचे महत्व  ही काळाची गरज आहे, सर्वानी ऊर्जा संवर्धनासाठी प्रयत्न केले पाहिजे आपल्या महानिर्मिती औष्णिक विद्युत केंद्रातील तर ऊर्जा संवर्धन सर्वानी केले पाहिजे सोबतच आपल्या परिसरातील जनमानसात, विद्यार्थ्यांत, समाजात,ऊर्जा संवर्धनाचे सामाजिक बांधिलकीचे काम केले पाहिजे प्रमुख अतिथी महाऊर्जाचे लातूर विभागीय कार्यालयाचे  महाव्यवस्थापक देवीदास कुलकर्णी यांनी औष्णिक विद्युत केंद्रातील सामाजिक जनजागृती च्या उदात्त हेतूने केलेल्या ऊर्जासंवर्धनाच्या कार्याची  प्रसंशा करून म्हणाले की प्रत्येकांनी उर्जासंवर्धनाचा वसा घेतला पाहिजे व कार्याची व्याप्ती वाढविली पाहिजे महाऊर्जा विभागातील विविध योजना,महाराष्ट्र शासनातील ऊर्जा संदर्भातील विविध योजनांची थोडक्यात माहिती दिली औष्णिक विद्युत केंद्र वसाहतीतील सर्व शाळा व आजू बाजूचे काही निवडक शाळा ह्या ऊर्जा क्लब म्हणून घोषित करण्यात येतील असेही त्यांनी या वेळी माहिती देताना म्हणाले.

अध्यक्षीय भाषणांत मुख्य अभियंता मोहन आव्हाड म्हणाले कि,ऊर्जा संवर्धन ची जनजागृती करण्यासाठी परळी औष्णिक विद्युत केंद्राचा ऊर्जा संवर्धन केंद्र विभागाचा चमू आजू बाजूच्या काही शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांमध्ये ऊर्जा संवर्धनाचे महत्व व त्यांचे मूल्य रुजवीन्यासाठी विविध स्पर्धा,वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांना LED बल्ब, प्रमाणपत्र व शाळेला ऊर्जा संवर्धक मित्र  म्हणून गौरन्वित करण्यात आले प्रत्येकांनी ऊर्जा संवर्धन करण्यासाठी मनापासून तळमळीने प्रयत्न केले तर आगामी काळात भारत हा उर्जासमृद्ध व ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबी, आत्मनिर्भर देश म्हणून जगात महासत्ता बनेल ऊर्जा संवर्धक मित्र अशी संज्ञा संबोधणारी नवी संकल्पना प्रथमच मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांच्या संकल्पनेतून साकारली त्यात ऊर्जा संवर्धनाचे तळमळीने काम करणाऱ्या  व्यक्तीस अथवा संस्थेस प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते कार्यक्रमात विद्युत केंद्रातील स्पर्धेत भाग घेतलेल्या स्पर्धकांचे,ऊर्जा मित्रांचे यथोचित बक्षिसे, LED,पेन, dairy देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाचे सूत्र संचलन अभियंता कु सोनाली डोंगरे व आभार प्रदर्शन अभियंता जयवर्धन सूर्यवंशी यांनी केले.

या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी जे एन देशमाने व आर एस कांबळे ,कार्यकारी अभियंता,ऊर्जा  व्यवस्थापक अभि डी डी कोकाटे,अभि.संतोष कापावार,अभि.अविनाश खरसडे,अभि.विलास कटारे,मनोज जाधव,अमीनखान  पठाण,गोविंद बदाले, गजानन जोशी,संदीप पाटील,महेश मुंडे,भास्कर नावंदे, कैलाश कांबळे,विनोद शेप,जनार्धन रोडे,पवन,महादू सातपुते,ओम मिंदे,इ यांचे सहकार्य लाभले या कार्यक्रमात औष्णिक विद्युत केंद्रातील सर्व विभाग प्रमुख,अधिकारी,अभियंते,तंत्रज्ञ,महिला कर्मचारी,कंत्राटी कामगार इ बहुसंख्येने उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या