💥पुर्णा न्यायालयाचा महत्वपुर्ण निकाल ; धनादेश न वठल्या प्रकरणातून आरोपीची निर्दोश मुक्तता....!


💥आरोपीची यशस्वीपणे बाजू मांडून त्याची निर्दोष मुक्तता करणारे ॲड.संजय प्रधान यांचे सर्वत्र होत आहे कौतुक💥

पुर्णा (दि.२७ डिसेंबर) - येथील फौजदारी व दिवाणी न्यायालयाने धनादेश न वठल्या प्रकरणातून आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे शहरातील हरिनगर परिसरातील रेल्वे कर्मचारी तेजाड यांना खाजगी कामानिमित्ताने पैशाचे काम असल्याने प्रकरणातील फिर्यादीने आरोपीस चार महिण्याकरीता दोन लाख रुपयें हात उसने म्हणून दिले होते.

कालावधी संपल्यानंतर फिर्यादीने नमूद प्रकरणातील आरोपी रेल्वे कर्मचाऱ्यास पैशाची मागणी केली असता आरोपीने फिर्यादीस नगदी रक्कम न देता दि.२२ फेब्रुवारी २०१८ रोजी भारतीय स्टेट बँक शाखा पुर्णाचा दोन लाख रुपयांचा धनादेश दिला होता सदरील धनादेश बँकेत वठवण्यास टाकला असता खात्यात पुरेशी रक्कम नसल्यामुळे धनादेश बाद झाला.बँकेने 'रक्कम अपर्याप्तचे' कारण सांगून परत केला या केसचा निकाल दि.०१ डिसेंबर २०२१ रोजी लागला या प्रकरणात आरोपी पक्षा तर्फे पुर्णा येथील जेष्ठ विधिज्ञ ॲड.संजय प्रधान यांनी सन्माननीय न्यायालया समोर आरोपीची यशस्वीपणे बाजू मांडल्याने न्यायालयाने त्यांची बाजू ग्राह्य धरून सन्माननीय न्यायाधीश श्री.टि.एच.शेख यांनी आरोपीस निर्दोष मुक्त केले.

धनादेश न वठल्या प्रकरातून आरोपीची निर्दोष मुक्तता होण्याची ही पहिलीच घटना असून आरोपीची यशस्वीपणे बाजू मांडून त्यांची निर्दोष मुक्तता करणारे ॲड.संजय प्रधान यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या