💥"तो दिवस दूर नाही,भारताचे संविधान जग स्विकारेल" - डॉ. दत्तात्रय वाघमारे


💥विसाव्या संविधान गौरव सोहळ्याच्या पूर्व तयारीच्या निमित्ताने आयोजित बैठकीत त्यांनी विचार व्यक्त केले💥



पूर्णा (दि.२९ डिसेंबर) :  डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाची गुणवत्ता एव्हडी मोठी आहे, की हे संविधान समस्त मानव जातीचे कल्याण करू शकते. मला स्वतःला डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा सहवास लाभला, त्यांनी लिहिलेले संविधान हे फक्त भारताचेच नव्हे, तर संपूर्ण जगाचे कल्याण करेल,असा मला पूर्ण विश्वास वाटतो "आता तो दिवस दूर नाही,सर्व जग भारताचे संविधान स्वीकारेल" असे भावनिक विधान पूर्णेचे जेष्ठ समाजसेवक डॉ दत्तात्रय वाघमारे यांनी विसाव्या संविधान गौरव सोहळ्याच्या पूर्व तयारीच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या पूर्णा नगर परिषदेच्या सभागृहात झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत व्यक्त केले. ते या बैठकीच्या अध्यक्ष पदावरून बोलत होते.

 
या बैठकीचे आयोजन संविधान गौरव समितीचे प्रमुख संयोजक रिपाई नेते प्रकाश कांबळे यांनी केले होते या बैठकीत न प पूर्णा चे गटनेते उत्तम खंदारे, नगरसेवक हर्षवर्धन गायकवाड, ऍड धम्मदीप जोंधळे, दादाराव पंडित,अनिल खर्गखराटे, रौफ कुरेशी, प्रा अशोक कांबळे, प्रा डॉ आदिनाथ इंगोले, गौतम मूळे, अनिल वहिवळ, लक्ष्मीकांत शिंदे,नागेश ऍंगडे, भीमा वाहुळे, माजी नगराध्यक्ष दिलीप हनुमंते, कामगार नेते अशोक व्ही कांबळे, आदि मान्यवरांनी संविधान पर मार्गदर्शन करून, 20 सा वा संविधान गौरव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्याबाबतची मनोगते व्यक्त केली.


या प्रसंगी शीघ्र कवि उमेश बाराहाटे यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याने त्यांचा संविधान समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला या बैठकीला प्रामुख्याने माजी नगरसेवक सुनील जाधव, शिवाजी वेडे,मोहन लोखंडे, संजय शिंदे, अनिल नरवाडे, सिद्धर्थ भालेराव, अशोक आहिरे, शाहीर गौतम कांबळे, बोधाचार्य त्रिम्बक कांबळे, अमृत मोरे, उत्तम सोनूले, नसीर शेख, यशवंत कावळे, दिलीप गायकवाड, साहेबराव सोनवणे, भीमराव राऊत, रेवनाजी कापुरे, विजय जोंधळे, सय्यद रहीम, जि एस झोडपे, मिलिंद कांबळे, प्रकाश खरे,शामराव जोगदंड, अतुल गवळी, किशोर ढकरगे, बी बी वाघमारे, राहुल वाहूळे,पांडुरंग आहिरे आदींसह मोठ्या संख्येने विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी बैठकीला उपसस्थित होते,

   संविधान प्रबोधनासाठी 25 आणि 26 जानेवारी2022 रोजी दोन दिवसाचे कार्यक्रम घेण्याचे एकमताने ठरले, संविधान बचाओ, देश बचाओ, हा कार्यक्रम राज्यव्यापी घेण्याचाही निर्णय घेण्यात आला, या कार्यक्रमासाठी विद्वान वक्त्यांना पाचारण करण्याचा निर्णय घेण्यात आला, या बैठकीचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष श्रीकांत हिवाळे यांनी केले.बैठकीला मोठ्या संख्येने नागरिकांची उपसस्थिती होती....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या