💥आयोध्यानगर येथे श्रीमद्‌ भागवत कथा व लक्ष्मण शक्ती कार्यक्रमाचे आयोजन ; भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन....!


💥भागवताचार्य हभप.पुराणिक धरणीधर महाराज मरळवाडी करणार कथा निरुपण💥

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- शहरातील आयोध्यानगर येथे शुक्रवार दि.24 डिसेंबर पासून श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यास प्रारंभ होत असुन ह.भ.प.पुराणिक धरणीधर महाराज मरळवाडी हे कथा प्रवक्ते आहेत. दि.31 डिसेंबर पर्यंन्त चालणार्‍या या भागवत कथा सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भाविक भक्तांनी कथा ज्ञान अमृताचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


आयोध्यानगर येथे प्रतिवर्षी याहीवर्षी  श्री वैद्यनाथ प्रभुंच्या कृपेने श्रीमद्‌ भागवत कथा व लक्ष्मण शक्तीच्या कार्यक्रमांचे शुक्रवार दि.24 ते 31 डिसेंबर या दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. यात  ज्ञानेश्‍वरी पारायण, श्रीमद् भागवत कथा, महाआरती, भावार्थ रामायण असे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. श्रीमद् भागवत कथा प्रवक्ते म्हणून भागवताचार्य ह.भ.प.पुराणिक धरणीधर महाराज मरळवाडीकर हे ज्ञानेश्‍वरी पारायण नेतृत्व ह.भ.प.परमेश्वर महाराज फड, प्रेरणा स्थान व प्रमुख उपस्थिती ह.भ.प.विनायक महाराज गुट्टे (श्री संत जनाबाई संस्थान गंगाखेड), सिंध साथ व गायक श्रीमंत महाराज मुंडे जिरेवाडीकर, तबला व पँड वादक अविनाश महाराज शिंदे, कोरस गायक कामाजी महाराज गुट्टे कासारवाडी हे राहणार आहेत. तर विशेष उपस्थिती म्हणून ह.भ.प.माऊली महाराज ऊखळीकर, संतराम आण्णा मुंडे, गंगाधर महाराज फड, आप्पाराव तांबडे, तळेगाव, भरत महाराज जोगी, पांडुरंग महाराज ठाकूर, उत्तम महाराज मैंदवाडीकर, मुरलीधर मुंडे डाबीकर हे राहणार आहेत. तसेच शुक्रवार दि.31 डिसेंबर रोजी लक्ष्मण शक्ती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी परीसरातील भाविक भक्तांनी कथा ज्ञान अमृताचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या