💥पुर्णेतील बौद्धाचार्य उमाजी (उमेश) बऱ्हाटे यांना महाराष्ट्र भुषण जाहीर....!


💥त्यांच्या सामाजिक व धार्मिक काव्य लेखनाबद्दल सन्मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला💥

पूर्णा (दि.२४ डिसेंबर) - सुप्रसिद्ध कवी व भारतीय बौद्ध महासभेचे शहर कोषाध्यक्ष उमेश बराटे यांना संत कबीर समता परिषदेचा त्यांच्या सामाजिक व धार्मिक काव्य लेखनाबद्दल सन्मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे दिनांक 26 डिसेंबर रोजी शंकराव चव्हाण सभाग्रह या ठिकाणी दुपारी 1.30 वाजता माजी मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार अशोकराव चव्हाण व सुप्रसिद्ध सिनेअभिनेते माननीय मकरंद अनासपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रदान करण्यात येणार आहे.

संत कबीर समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मुकुंदराज पाटील व मुंबई हिंदी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर बलदेव सिंह चव्हाण समता परिषदेचे बालाजी कठे वाढ यांच्या प्रमुख संयोजना खाली या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे या कार्यक्रमास विशेष उपस्थिती  माननीय खासदार हेमंत पाटील,  माजी खासदार डॉक्टर व्यंकटेश काब्दे माजी आमदार डी पी सावंत बर्डे आमदार मोहन अण्णा हंबर्डे कल्याणकर आमदार बालाजीराव कल्याणकर श्री शामसुंदर शिंदे आमदार श्यामसुंदर शिंदे आदींची उपस्थिती असणार आहे.

पुरस्कार वितरणाच्या अगोदर विद्रोही कवी संमेलन व गायिका आम्रपाली येरेकर मुंबई व रेखाताई मनाठकर यांचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहे सन्मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल बौद्धाचार्य उमेश बराटे यांचे अभिनंदन भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत हिवाळे सरचिटणीस अतुल गवळी कोषाध्यक्ष किशोर ढा क र गे शहराध्यक्ष बोध आचार्य त्रंबक कांबळे माजी तालुका अध्यक्ष शामराव जोगदंड, मुगाजी खंदारे बाबाराव वाघमारे ज्ञानोबा जोंधळे आदींनी केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या