💥जिंतुर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी शहेजाद खान तर कार्याध्यक्ष पदी गुणीरत्न वाकोडे...!


💥मावळते अध्यक्ष गजानन चौधरी यांच्या उपस्थितीत नूतन कार्यकारणीची बिनवीरोध निवड💥 

 जिंतुर ; शहरातील पत्रकार भवनात बुधवार 22 डिसेंबर रोजी तालुका मराठी पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. संघाच्या नूतन अध्यक्ष पदी शहेजाद खान यांची तर कार्यअध्यक्ष पदी गुनिरत्न वाकोडे व सचिव पदी रामप्रसाद कंठाळे यांची निवड करण्यात आली आहे.

तालुका मराठी पत्रकार संघाच्या कार्यकारणीचा कार्यकाळ पूर्ण झाल्या मुळे बुधवार 22 डिसेम्बर रोजी शहरातील पत्रकार भवनात जेष्ठ पत्रकार एम ए माजीद यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकारांची सामूहिक बैठक आयोजित करण्यात आली होती या वेळी अकबर सिद्दीकी,निहाल अहेमद,एस के अहमद,दिपक राजुरकर,मावळते अध्यक्ष गजानन चौधरी यांच्या उपस्थितीत नूतन कार्यकारणीची बिनवीरोध निवड सर्वानुमते करण्यात आली.

उर्ववित कार्यकारणी पुढील प्रमाणे उपाध्यक्ष सहसचिव रियाज चाऊस,उपाध्यक्ष मोया शेख, भास्कर चौधरी,शेख नैमोद्दीन,बालाजी शिंदे,कोषाध्यक्ष एम एजाज,सह कोषाध्यक्ष शेख आलीम तर सदस्य पदी सय्यद नसीर,गजानन काळे,सुगाजी गरगड़े,सिराज सिद्दीकी,यांची निवड करण्यात आली.तर मार्गदर्शक म्हणून एम ए माजीद राजाभाऊ नगरकर,दिपक राजुरकर व सल्लागार म्हणून गजानन चौधरी, विनोद पाचपिले राहणार आहेत. या प्रसंगी शेख शकील,एम के कादरी,शेख आबेद या सह तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते. या निवड प्रक्रियाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख शकील यांनी केले नूतन कार्यकरानीचा सर्वानुमते सत्कार करण्यात आला...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या