💥परभणी जिल्ह्यातील मुदत संपणाऱ्या नगरपालिकांवर प्रशासक नियुक्त करण्याचे नगर विकास खात्याचे आदेश....!


💥जिल्ह्यातील पुर्णा,गंगाखेड,जिंतूर,सेलू,मानवत,पाथरी या नगर पालिकांची मुदत संपणार २९ डिसेंबर रोजी💥 

 परभणी (दि.२७ डिसेंबर) - जिल्ह्यातील मुदत संपणाऱ्या नगर पालिकांवर मुदत संपल्यानंतर जिल्हा महसूल प्रशासनाने प्रशासक नियुक्त करावेत असे आदेश नगर विकास विभागाने सोमवार दि.२७ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी एका आदेशाद्वारे बजावले आहेत.

कोरोंना विष्षाणूच्या वाढता प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर मुदत संपणाऱ्या नगरपालिकांत तातडीने सार्वत्रिक निवडणुका घ्यावयास संदर्भात काहीसा कालावधी लागणार असल्यामुळेच नगर विकास विभागाने या मुदत संपणाऱ्या नगरपालिकांवर जिल्हा प्रशासनाने तातडीने प्रशासक नियुक्त करावेत असे आदेश काढले आहेत.

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी व पूर्णा या नगरपालिकांची मुदत २९ डिसेंबर रोजी संपणार आहे .सोनपेठ नगरपालिकेचे मुदत आठ जानेवारी रोजी संपणार आहे .

या पार्श्वभूमीवर नगर विकास विभागाने गंगाखेड पालिकेचा मुख्खाधिकारी यांना तर जिंतूर सेलू मानवत पाथरी पूर्णा व सोनपेठ पालिकेत चा संबंधित उपविभागीय अधिकार्‍यांकडे प्रशासक म्हणून पदभार सुपूर्त करावा असे निर्देश दिले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या