💥परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदार संघातील उभरते नेतृत्व संतो मुरकुटे यांचा भाजपात प्रवेश...!


💥मुंबईत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला पक्ष प्रवेश सोहळा💥 

परभणी दि.२७ डिसेंबर) - जिल्ह्यातील गंगाखेड-पालम-पुर्णा विधानसभा मतदार संघातील उभरते वादळी नेतृत्व तथा प्रभावी तरुण तडफदार नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे व पुर्वाश्रमीचे कट्टर शिवसैनिक संतोष मुरकुटे यांनी आज सोमवार दि.२७ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी ०६-४५ वाजेच्या सुमारास मुंबईत भारतीय जनता पक्षात जाहिर प्रवेश केल्याने गंगाखेड विधानसभा मतदार संघात भारतीय जनता पार्टीला पुन्हा एकदा सोन्याचे दिस येणार आहेत. 


भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयात आयोजित केलेल्या या प्रवेश सोहळ्यास राज्याचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड ,भाजपाचे डॉक्टर सेलचे प्रदेश अध्यक्ष अजित गोपछडे, जिल्हाध्यक्ष डॉ.सुभाष कदम, प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रमोद वाकोडकर, विठ्ठलराव रबदडे यांच्यासह अन्य नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .यावेळी भाजपाचे नेते मंडळींनी मुरकुटे यांचे स्वागत केले. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या