💥मेडिकल ला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी...!


💥एमबीबीएस/बिडीएस/बिएएमएस/बिएससीसह नर्सिंग प्रवेश प्रक्रिया अखेर सुरू💥

💥निट यूजी 2021 परीक्षेत पात्र असलेल्या विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा - विश्वजीत मुंडे

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी शहरातील व परिसरातील  विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की MBBS/BDS/BAMS/BHMS/BUMS/B.PTH/BoTh/BASLP/B(P&O)/B.Sc.(नर्सिंग) या आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया दि.30/12/2021 पासुन  सुरु झाली असून  त्याचा अंतिम दिनांक 05/01/2022 हा आहे तसेच ओरिजिनल कागदपत्रे अपलोड करण्यासाठी  दि.06/01/2022 संध्याकाळी 5.00 पर्यंत वेळ देण्यात आला आहे. 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी नीट यूजी 2021 मार्कशीट, नीट यूजी 2021 अ‍ॅडमिट कार्ड, नॅशनलिटी डोमिसाईल प्रमाणपत्र, दहावी ची सनद, बारावीचे गुणपत्रक, मेडिकल फिटनेस प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र, नॉन-क्रिमि लेयर प्रमाणपत्र, EWS प्रमाणपत्र, अपंग विद्यार्थ्यांसाठी DISABLITY सर्टिफिकेट इ. कागदपत्रे ओरिजिनल प्रती मध्ये विद्यार्थ्यांनी सोबत आणणे आवश्यक आहे. तसेच वरील सर्व आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांकेंद्राच्या प्रवेश प्रक्रिये चा अर्ज करताना स्टेट कोट्यासाठी Rs.1000/- संस्थात्मक  कोट्यासाठी Rs.5000/- आणि ज्या विद्यार्थ्यांना दोन्ही कोट्यातून अर्ज करायचा आहे  त्यांच्यासाठी Rs.6000/- असे ऑनलाइन प्रक्रिया शुल्क भरणे अनिवार्य आहे त्याशिवाय विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र असे गृहीत धरले जाणार नाही याची पालक व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. मागील वर्षी प्रमाणे याही वर्षी शासनातर्फे E-Verification प्रणाली चा वापर करण्यात येणार आहे. वरील सर्व  ओरिजिनल कागदपत्रे  verify झाल्यानंतर 08/01/2022 ला तात्पुरती राज्य गुणवत्ता यादी संकेतस्थळावर संध्याकाळी  5.00 वाजता प्रकाशित केली जाणार आहे.  वरील  सर्व प्रवेश प्रक्रिया ही लातूर च्या धर्तीवर परळी येथे मागील दोन वर्षांपासून सुरू झालेले परळी शहरातील एकमेव सुरू प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्रा तर्फे  अचूक मार्गदर्शन करून  दिली जाणार  आहे.  माध्यमातून परळीच्या पालक व विद्यार्थ्यांची पुढील प्रवेश घेते वेळी  होणारी धावपळ लक्ष्यात घेऊन,लातूरच्या सुप्रसिद्ध ऍडमिशन मेड इझी चे संचालक श्री.सचिनजी बांगड सर यांच्या मार्गदर्शनाखाली परळी येथे प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्र  सुरु करण्यात आलेले आहे.या प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्रामार्फत विद्यार्थी व पालकांना प्रवेश प्रक्रिया फॉर्म, ऑप्शन फॉर्म(कॅप राऊंड) व कोर्स संबंधित माहिती दिली जाणार आहे.प्रथमच  लातूरच्या धर्तीवर खास पालक व विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव परळी शहरात एकमेव  प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले आहे. 2021- 22 या कालावधीत होणाऱ्या सर्व प्रवेशांची नोंदणी प्रक्रिया सुरभी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्र येथे सुरू झाली  आहे. विद्यार्थ्यांना अचूक मार्गदर्शन करून ऑनलाईन प्रक्रिये द्वारे प्रवेश मिळवून देणारे  परळी शहरातील एकमेव 

 प्रवेश मार्गदर्शन केंद्र परळीकरांच्या सेवेत रुजू झाले आहे. अधिक माहितीसाठी सुरभी  प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्र चे संचालक श्री.विश्वजीत मुंडे सर यांच्याशी *9158363277*  या क्रमांकावर संपर्क साधावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या