💥पुर्णेत पंतप्रधान आवास योजनेचा कोट्यावधी रुपयांचा निधी चोरांच्या घशात ? कुशागृह असोसिएट प्रा.लिमिटेड अदृश्य...!


💥पंतप्रधान आवास योजनेतील अनेक लाभार्थ्यांना ठेवले अनुदाना पासून वंचित ; अर्जदार लाभार्थ्यांच्या पावत्यांचा मोठा घोळ💥

पुर्णा (दि.२१ डिसेंबर) - पुर्णा नगर परिषद प्रशासनाकडून शहरात सर्वत्र राबवण्यात येत असलेल्या पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांचा सर्वे करण्यासाठी नेमणूक केलेल्या नांदेड येथील कुशागृह असोसिएट प्रा.लिमिटेड या कंपनीला सन २०१८/१९ यावर्षी देण्यात आले होते सदरील कंपनीच्या सर्वे करणाऱ्या लोकांनी या योजनेसाठी अर्ज मागवण्यास सुरूवात केली यावेळी तब्बल १ हजार ८२ लोकांनी अर्ज केले प्रत्येक अर्जदाराकडून सर्वसाधारण पावती म्हणून शंभर रुपये प्रमाणे रक्कम वसूल करण्यात आली यावेळी या योजनेच्या प्रकल्प अधिकारी गाडेकर यांनी व नमूद कुशागृह असोसिएट प्रा.लिमिटेड या कंपनीच्या लोकांनी ९५१ डिपीआर मंजूर केल्याने शासनाने प्रतिलाभधारक १,५०,०००/- रुपये प्रमाणे निधी उपलब्ध करून दिला खरा परंतु हा निधी सुध्दा वेळेवर लाभार्थ्यांना देण्यात आला नाही या निधी फिक्स डिपॉझीट मध्ये टाकून वरील मलाई चाटण्याचे दुष्कृत्य नगर परिषद प्रशासनाकडून करण्यात आले  ९५१ मंजूर डिपीआर मध्येही अफरातफर करून योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या प्रकल्प अधिकारी गाडेकर व अन्य कर्मचाऱ्यांनी मनमानी पध्दतीने पुन्हा ८४९ लोकांची यादी बेकायदेशीरपणे बनवून अनेक खऱ्या लाभार्थ्यांना या योजनेपासून वंचित ठेवण्याचे महापाप तर केलेच याशिवाय हजारो अर्जदारांनी सर्वसाधारण पावती रुपाने प्रति अर्जदार १०० रुपये प्रमाणे जमा केलेल्या लाखो रुपयांचे काय झाले ? या प्रश्नाचे उत्तर आता दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी गोयल यांनाच शोधावे लागणार असून यानंतर पंतप्रधान आवास योजना २०२०/२१ करीता दुसऱ्या टप्प्यात अर्ज करण्याचे आवाहन नगर परिषद प्रशासनाकडून करण्यात आले यावेळी सुध्दा असंख्य अर्जदारांनी अर्ज केले यावेळी ७८६ डिपीआर मंजूर करण्यात आले यावेळी मात्र संबंधित योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थेसह प्रकल्प अधिकाऱ्यांनी अनेक अर्जदारांना पावतीबुक संपल्याचे कारण दाखवून सर्वसाधारण पावती देण्याचे टाळले व आता आपल्या अर्जाचे काय झाले अशी विचारणा करण्यास आलेल्या अर्जदारांना अगोदर पावती द्या पावती नसेल तर सरळ हाकलून देण्याचा उद्योग आरंभल्याने अनेक गोरगरीब अर्जदार त्रस्त झाल्याचे निदर्शनास येत आहे.

पुर्णा नगर परिषद प्रशासनाने पंतप्रधान आवास योजनेच्या सर्वेक्षणासाठी व या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी नेमलेल्या नांदेड येथील कुशागृह असोसिएट प्रा.लिमिटेड या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून संबंधित कंपनीला नगर परिषद प्रशासनाने आतापर्यंत मोबदला म्हणून जवळपास ५० लाख रुपये कोणत्या आधारे देण्यात आले ? या प्रश्नाचे गौडबंगाल काय  याची सुध्दा चौकशी होणे आता अत्यंत आवश्यक झाले आहे केद्र शासन व राज्य शासनाने सदरील पंतप्रधान आवास योजना योजना गोरगरीब बेघर लोकांसाठी राबण्याच्या उद्देशाने लागू केली असतांना संबंधित योजनेचा सर्वे करणाऱ्या कुशागृह असोसिएट प्रा.लिमिटेड या संस्थेने मनमानी पध्दतीने सर्वे करून सदरील योजना चोरांच्या घश्यात टाकण्याचे काम केल्याचे चौकशी अंती निष्पन्न होईल सदरील कुशागृह असोसिएट प्रा.लिमिटेड या संस्थेचे शहरात कुठेही कार्यालय अस्तित्वात नसून संबंधित संस्थेशी लाभार्थ्यांनी संपर्क करायचा तरी कुठे व कसा ? असा गंभीर प्रश्न उपस्थित होत असून नगर परिषदेतील भ्रष्ट अधिकारी व संबंधित संस्थेच्या संगणमतातून योजनेची वाट लागल्याचे दिसत असून अनेक लाभार्थी अजूनही अनुदानापासून वंचित असून नगर परिषदेत चकरा मारून मारून आपली पादत्राने झिजवतांना दिसत असून पंतप्रधान आवास योजनेतील थकीत अनुदानासाठी उपोषणाचा मार्ग पत्करणाऱ्या उपोषणार्थींना लेखी आश्वासन दिल्यानंतर ही अनुदान देण्यास टाळाटाळ करून उपोषणार्थींची शुध्द फसवणूक करण्याचे प्रकार होत असल्याचेही समोर येत आहे.... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या