💥पाथरीत रेणुका शुगर्सची गाळप क्षमता वाढवण्या साठी २७ डिसेंबरला रास्ता रोको....!


💥पाथरीत सेलु कॉर्नर येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा रास्तारोको आंदोलन करण्याचा निर्णय💥

पाथरी:-रेणुका शुगर्स या साखर कारखाण्याची गाळप क्षमता वाढवण्यात यावी या साठी आता पाथरी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी कॉ राजन क्षिरसागर यांच्या नेतृत्वात पुढे सरसावले असून २३ डिसेंबर ला सहकार मंत्र्यांची भेट घेतल्या नंतर पाथरीत सेलु कॉर्नर येथे ऊस उत्पादक शेतकरी रास्तारोको आंदोलन करणार आसल्याचा निर्णय मंगळवारी पाथरीतील शासकिय विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

मंगळवार २१डिसेंबर रोजी पाथरी येथील शासकीय विश्रामगृह येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे परभणी जिल्हा सचिव कॉम्रेड राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली श्री रेणुका शुगर्स या कारखान्याची गाळप क्षमता वाढवण्या साठी आणि आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्या साठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात आली. यावेळी कॉम्रेड राजन क्षीरसागर यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधतांना म्हणाले की, पुसद येथील साखर कारखाण्याचे असेच एक प्रकरण कोर्ट कचेरीत अडकले होते. याबाबत महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी लक्ष घालून पुसद येथील कारखाण्याचा प्रश्न मार्गी लावून त्या कारखान्याची गाळप क्षमता वाढवली आहे.

त्यानुसार आपल्या रेणुका शुगर्स कारखाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी येत्या गुरुवारी दिनांक २३ डिसेंबर रोजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सोबत मंत्रालयात बैठकी साठी बोलावण्यात आले आहे.त्यानुसार कॉ राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वा खाली पाथरी तालुक्यातील एक शिष्टमंडळ मुंबई येथे जाणार आहे. त्या बैठकीत सहकार मंत्र्यांना या प्रकरणाची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. आणि पुसद येथील कारखाण्याचा प्रश्न जसा मार्गी लावला त्या पद्धतीने पाथरी येथील रेणुका शुगर्स या कारखाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी हे शिष्टमंडळ करणार आहे.

तसेच येणाऱ्या २७डिसेंबर २०२१ रोजी सेलू कॉर्नर पाथरी येथे होणाऱ्या रास्ता रोको यशस्वी करण्या साठी पाथरी तालुक्यातील गावागावात जाऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठका घेण्यात येणार आहेत, या रास्ता रोकोसाठी पाथरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कॉम्रेड राजन क्षीरसागर यांनी केले आहे.

या बैठकी साठी तालुका सेक्रेटरी कॉम्रेड ज्ञानेश्वर काळे, भाकप सोशल मीडिया सेल प्रमुख कॉम्रेड सुधीर कोल्हे, कॉम्रेड शिवाजी कदम, कॉम्रेड कैलास लिपणे, कॉम्रेड अरुण काळे, कॉम्रेड प्रशांत नखाते, कॉम्रेड नारायण दळवे, कॉम्रेड तुकाराम शिंदे, कॉम्रेड सुरेश नखाते, कॉम्रेड ओंकार नखाते, कॉम्रेड बाबासाहेब टेकाळे, कॉम्रेड शेख बडे साब, डॉ. राजेंद्र चौधरी यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या