💥निम्न दुधना प्रकल्पा अंतर्गत रखडलेल्या कामाची कार्यकारी अभियंता यांच्या कडून पाहणी.....!


💥प्रहार जनशक्ती पक्षाने तक्रार करून आंदोलनाचा इशारा दिला होता💥


परभणी - निम्न दुधना प्रकल्पा अंतर्गत येणाऱ्या झरी, दमाई वाडी,मिर्झापूर, साडेगाव, बोबडे टाकळी, सावंगी खुर्द, संबर, मटकराळा व मांगनगाव शिवारातून जाणाऱ्या उजव्या कालव्या वरील मायनर व छोट्या चाऱ्यांच्या गाळ काढणे, दुरुस्ती करणे व नियोजित चाऱ्या चे रखडलेली कामे पूर्ण होत नाही त्या मुळे शेतकऱ्यांना सिंचना साठी पाणी उपलब्ध होत नाहीत अशी या परिसरातील शेतकऱ्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाकडे लेखी मागणी केली होती त्या मागणीच्या अनुषंगाने प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने दि. रोजी कार्यकारी अभियंता, विभाग क्रमांक १० परभणी यांना लेखी निवेदन देऊन तत्काळ वरील कामे मार्गी लावावी अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने कार्यालयास टाळा ठोकण्याचा इशारा दिला होता.


 या तक्रारी ची तत्काळ दाखल घेऊन माजलगाव कालवा विभाग क्रमांक १० चे कार्यकारी अभियंता श्री. प्रसाद लांब व प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी संबंधित कामाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला व कालव्याची व मायनर ची दुरुस्ती, गाळ काढणे व मुख्य कालव्यावर सावंगी खुर्द, मांगनगाव व मटकराळा या ठिकाणी चार पुलाच्या कामाला तत्काळ सुरुवात करून कालव्या बाजूचे रस्ते तयार केले जातील असे आश्वासन देऊन काम येत्या ४ दिवसात सुरू करण्याचे आश्वासन या वेळी शेतकऱ्यांना दिले.

प्रहार जनशक्ती पक्षाच्या पुढाकाराने या परिसरातील कालव्याची व मायनर ची रखडलेले कामे मार्गी लावून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे त्या शिवाय कालव्यावर पुल झाल्यास शेतकऱ्यांची दळणवळणाची अडचण दूर होणार आहे. याचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांना मिळून सिंचनाचे क्षेत्र वाढणार आहे.

या वेळी  माजलगाव कालवा विभाग क्रमांक १० चे कार्यकारी अभियंता श्री. प्रसाद लांब, सहाय्यक अभियंता वर्ग १ श्रीमती अंजू काळे, कनिष्ठ अभियंता प्रशांत गायकवाड, प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, दिव्यांग आघाडी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर पंढरकर, उपतालुका प्रमुख ज्ञानेश्वर पूंजारे, मिडिया प्रभारी नकुल होगे, दत्तराव रवंदळे व परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या